आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Relief For Mayawati, SC Rejects Plea To Reopen CBI Probe In Disproportionate Assets Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मायावतींना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना सुप्रिम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची नव्याने सुनावणी सुरु करावी, अशा आशयाची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली आहे.

सरन्यायाधीश पी. सदाशिवम आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले आहे, की न्यायालयाने दिलेला निर्णय ताज कॉरिडॉर प्रकरणाशी संबंधित होता. त्याचा केद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चुकीचा अर्थ लावला आहे. बेहिशेबी मालमत्तेची पुन्हा चौकशी करण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.

सुप्रिम कोर्टात आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीत हे प्रकरण नव्याने का सुरु करावे, हे याचिकाकर्ता कमलेश शर्मा यांना पटवून देता आले नाही. न्यायालयाने म्हटले, की या प्रकरणात केवळ वकील बदलले असून जूनेच दावे केले जात आहेत.