आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे धाडस वाढले, कठोर कायद्यांमुळे महिलांना दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मार्च २०१३ मध्ये कायद्यात संशोधन करून बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नराधमांना शिक्षा व्हावी या उद्देशाने पीडित तरुणी, महिला पुढे येत आहेत.
अारोपींविरुद्ध तक्रारी वाढत असून गेल्या वर्षी महाराष्ट्रात बलात्काराच्या २५ हजारांवर घटनांची नोंद झाली आहे. २०१२, २०१३ च्या तुलनेत हा आकडा अधिक आहे.महिलांच्या सजगतेमुळे अशा घटनांच्या नाेंदी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याचे म्हणणे महिला अायाेगाचे अाहे. दरम्यान,केंद्रीय महिला बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राज्यातील वाढणाऱ्या घटनांबाबत खेद व्यक्त केला अाहे.
पीडितांनी आरोपींविरुद्ध तक्रारी देण्याचे धाडस दाखवले असले तरी गुन्ह्याचा आकडा चिंताजनक आहे. मेनका गांधी यांनी अलिकडेच महिला अत्याचार प्रकरणांचा आढावा घेतला. पुराेगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नाेंदीत वाढ झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा गुन्ह्यातील अाराेपींना तातडिने िशक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयात हे प्रकरणे चालविण्याच्या सूचना देण्यात अाल्या अाहेत. अाराेपींना कठाेर िशक्षा झाल्यास बलात्काराच्या घटना कमी हाेतील अशी शक्यता मेनका गांधी यांनी व्यक्त केली.

आंध्राततक्रारी सर्वाधिक :
२०११मध्ये देशात बलात्काराच्या लाख २८ हजार ६५० घटनांची नाेंद हाेती. २०१२ मध्ये यात वाढ हाेऊन लाख ४४ हजार २७० २०१३ मध्ये लाख हजार ५४६ घटनांची नाेंद झाली. अांध्रप्रदेश, उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्र िदल्लीत या गुन्ह्यांच्या नाेंदी माेठ्या प्रमाणात अाहेत. महाराष्ट्रात २०११ मध्ये १५ हजार ७२८, २०१२ मध्ये १६ हजार ३५३, २०१३ मध्ये २४ हजार ८९५ तर २०१४ मध्ये हा अाकडा २५ हजारावर असल्याची माहिती महिला बालविकास मंत्रालयाकडून मिळाली. सामुहिक बलात्कारासारखे प्रसंग अाेढवू नये यासाठी सरकारकडून महिला विद्यार्थीनींसाठी अात्मसरंक्षण प्रबाेधन अभियान सुरु करण्यात अाले अाहे.

‘निर्भया प्रकरणानंतर जागृती वाढली’
महिलाअायाेगाच्या सदस्या अॅड. विजया बांगडे यांनी सांिगतले की, निर्भया प्रकरणानंतर महाराष्ट्रात माेठ्या प्रमाणात जागृती झाली. अाधी महिला तक्रारी करायला घाबरत हाेत्या परंतु अाता त्यांना स्पर्शही केला तरी तक्रारी व्हायला लागल्या अाहेत. वराेराचे सत्र न्यायाधीश पी. एन. काझी यांनी अशाच एका प्रकरणी तरुणाला तीन वर्षांची िशक्षा सुनावली. त्याने एका मुलीला स्पर्श केल्याचा अाराेप हाेता. महिला अाता या बाबी लपवून ठेवण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे तक्रारींतून स्पष्ट होते. ही चांगली बाब असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.