आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remove Kejriwal From Party, Shanti Bhushan Demand

केजरीवालांना पदावरून हटवा; प्रशांत भूषण यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आप नेते प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना संयोजक पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांचे वडील शांती भूषण यांनीदेखील हा मुद्दा राष्ट्रीय परिषदेत मांडण्यात यावा, असे म्हटले होते. संस्थापक सदस्यांपैकी असलेल्या प्रशांत भूषण यांनी तिकीट वाटपाबाबत केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाची राष्ट्रीय बैठक घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष बदलले पाहिजेत. दिल्लीचा मुख्यमंत्री होण्याच्या लालसेने ते भरकटले आहेत, असे भूषण म्हणाले.