आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Report Based On FBI Analysis Of Sunanda Pushkar\'s Death Now With Cops

सुनंदा पुष्‍कर यांचा मृत्‍यू विषप्रयोगामुळेच, शशी थरूरांची पुन्‍हा होऊ शकते चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यूची कारणे लवकरच स्पष्ट होतील. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, असा दावा दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी केला. पण त्यांच्या शरीरात कुठलाही किरणोत्सारी पदार्थ आढळला नाही, हेही स्पष्ट केले.
दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीसोबत बैठक घेतली. बस्सी म्हणाले, ‘मृत्यू नैसर्गिक नव्हता हे स्पष्ट आहे. चौकशी व पुरावे यांच्या आधारे आम्ही हे निश्चितपणे म्हणू शकतो.’ दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ च्या रात्री सुनंदा पुष्कर यांचा रहस्यमय मृत्यू झाला होता. पोलिसांनी जानेवारी २०१५ मध्ये खून प्रकरण अशी नोंद केली होती. सुनंदांचा मृत्यू विषामुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत होती. त्यांचे व्हिसेरा नमुने वॉशिंग्टनमधील एफबीआयच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तेथील अहवालाचे विश्लेषण एम्सने केले.
काय आहे मेडिकल रिपोर्टमध्‍ये...
- वॉशिग्‍टनवरून आलेल्‍या आयएफबीआयच्‍या रिपोर्टला एम्स मेडिकल बोर्डात पाठवले होते.
- एम्स रिपोर्टनुसार, सुनंदा यांचा मृत्‍यू विषामुळे झाला होता.
- आता सुनंदा प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी एम्सच्‍या रिपोर्टचा अभ्‍यास करणार आहे.
आतापर्यंत 6 साक्षीदारांच्‍या पॉलिग्राफ चाचण्‍या
- सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही असा अहवाल अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने दिला होता.
- या रिपोर्टनंतर दिल्ली पोलिसांनी पुढील तपास करण्‍याआधी एफबीआयचा रिपोर्ट एम्‍स मेडिकल बोर्डाकडे सोपवला.
- या प्रकरणात आतापर्यंत 6 साक्षीदारांच्‍या पॉलिग्राफ चाचण्‍या करण्‍यात आल्‍या.
- ज्‍या लोकांची पॉलिग्राफ चाचणी केली त्‍यामध्‍ये थरूर यांचा नोकर नारायण सिंह, ड्रायव्‍हर बजरंगी आणि सुनंदा यांचे मित्र संजय दीवान यांचाही समावेश होता;
- पोलिसांनी या प्रकरणी थरूर यांचीही चौकशी केली आहे.
काय आहे प्रकरण?
- जानेवारी 2014 मध्‍ये सुनंदांचा मृतदेह दिल्लीच्‍या एका पंचतारांकित हॉटेलात आढळला होता.
- मृत्‍यूच्‍या एकदिवस आधी सुनंदा यांचा पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत ट्विटरवरून वाद झाला होता.
- सुनंदा यांचा आरोप होता की, त्‍यांचे पती शशी थरूर आणि मेहर यांच्‍यात अफेअर होते.
- मागील वर्षी फेब्रुवारी महिन्‍यात सुनंदाचे व्‍हिसेरा नमुने वाशिंग्‍टनमधील एफबीआय लॅबमध्‍ये पाठवण्‍यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...