आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SURVEY : मोदींवर ६१% तरुणांचा विश्वास, ३८% म्हणाले- अच्छे दिन आ गये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकारचे एक वर्ष कसे गेले? युवा भारताला दैनिक भास्करने ही विचारणा केली. युवकच का? कारण तेच खरे गेमचेंजर होते. देशातील ८३ कोटी मतदारांपैकी ४५ कोटी तरुण, अर्थात चाळिशीच्या आतील आहेत. या शक्तीवरच देशात ३० वर्षांनंतर पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन झाले. मोदींचे ध्येय सुशासन असल्याचे ५५ % युवकांना वाटते. सरकारच्या कामकाजावर ६१ % तरुण समाधान व्यक्त करतात. मात्र, अनेक प्रश्नांवर ते मौन पाळतात. कारण पूर्ण चित्र स्पष्ट व्हावयाचे आहे.
दैनिक भास्कर-इप्सॉस सर्वेक्षणातून प्रामुख्याने तीन मुद्दे समोर आले.
१. रोजगार, महागाई किंवा भ्रष्टाचार, या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचे युवकांना वाटते.
२. ज्या राज्यांतून लोकसभेच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या त्याच राज्यांत सर्वाधिक असंतोष. द. भारतात एनडीएला जागा कमी मिळाल्या, परंतु "अच्छे दिन'ची आशा तिथेच अधिक.
३. सरकारच्या सरासरी कामगिरीवर ६१ % युवक समाधानी.
ज्या "अच्छे दिन'ची आश्वासने होती ते आले का? - ३८ % म्हणाले आले; परंतु ५४ % म्हणाले नाही. यानंतरच्या काळात आशा असल्याचे २४ % युवकांनी सांगितले. असे एकूण ६२ % युवक अजूनही सरकारला पाठिंबा देणारे असल्याचे आढळून आले.
महत्त्वाचा मुद्दा -रोजगार : रोजगार वाढीसाठी सरकार काहीही करू शकले नाही, असे ६६ % युवकांना वाटते. ४५ % युवकांना आता आशाही नाहीत. सध्या काहीच बदलले नसल्याचे मध्य प्रदेशातील ५५ % युवक म्हणाले. मात्र, ४० % ना मोदींकडून खूप आशा आणि विश्वास आहे.

वाद - हे सुटाबुटातील सरकार आहे? : ६१% युवकांना असे वाटत नाही. त्यांच्या मते हे समजदार व अभ्यासू सरकार आहे.
मागच्या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा -महागाई : ५६% युवकांच्या मते महागाई कमी झाली नाही. तसा भ्रष्टाचारही थांबला नाही. परंतु समाधान हेच की नवीन घोटाळेही उघडकीस आले नाहीत. काळा पैसा देशात परत आणण्याच्या प्रयत्नांना ४३ % युवकच गंभीर मानतात. द. भारतातील राज्ये मात्र समाधानी असून विशेषत: भाजपशासित राज्यांत नागरिक समाधान व्यक्त करतात.
सर्वेक्षणाची पद्धत
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांची मते जाणून घेण्यासाठी या सर्वेक्षणात इप्सॉसने स्ट्रॅटिफाइड रँडम सॅम्पलिंग मेथडमधून २३४७ नोंदणीकृत मतदारांच्या संगणकीकृत मुलाखती घेतल्या. या आकडेवारीत २.७ टक्क्यांपेक्षा अधिक मार्जिन ऑफ एरर नसल्याचा ठाम दावा सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीने ९९ टक्के विश्वासासह केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदी सरकारच्या कामाबाबत तरुणांनी मांडलेली विविध मते...