आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REPORT : सोनिया सोडणार काँग्रेस अध्यक्षपद, प्रियंका लढवणार निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची मुलगी प्रियंका गांधी. - Divya Marathi
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची मुलगी प्रियंका गांधी.
नवी दिल्ली - काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. सोनिया गांधी लवकरच अध्यक्षरदासह खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने सुत्रांच्या हवाल्याने तसा दावा केला आहे. एवढेच नाही तर, सोनियांच्या राजीनाम्यामुळे रायबरेलीची जागा पुन्हा रिकामी होणार आहे. त्याठिकाणी पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. दिल्लीत 24, अकबर रोड स्थित येथील पक्षाच्या मुख्यालयात सध्या या चर्चांना उधाण आले आहे.

राहुल गांधी बनू शकतात अध्यक्ष
सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन पदाचा राजीनामा देऊ शकतात, असा दावाही करण्यात आला आहे, पक्षात सध्या उपाद्यक्षपदाची जबाबदारी असणारे राहुल गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता आहे.

याच महिन्यात उपचारासाठी अमेरिकेला जाणार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी याच महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा उपचारासाठी अमेरिकेला जाणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्या अनेकदा उपचारासाठी अमेरिकेला गेल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...