आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे मिनी इंडीया, पाहा भारताचे शौर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवि दिल्‍ली- प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने गुरूवारी 26 जानेवारीला राजपथावर होणा-या शानदार संचलनाची रंगीततालीम करण्‍यात आली. या वेळी भारतीय वायू दल व लष्‍कराचे समग्र दर्शन झाले. ही रंगीततालीम पाहण्‍यासाठी दिल्‍लीत मोठ्या संख्‍येने लोक जमले होते. यावेळी भारतीय सेना आणि पोलीस दलाने रायसीना हिल्‍स ते लाल किल्‍ल्‍यापर्यंत मोठ्या थाटात हा सोहाळा रंगला होता.

भारतीय वायु दलाच्‍या चार लढाऊ विमानांनी तिरंगा फडकवत या रंगीततालमीला प्रारंभ केला. भारतीय सेनेचा हा सोहळा नेत्रदिपक ठरला.भारताने बनविलेल्‍या पहिल्‍या लढाऊ विमानापैकी तेजस, टी90 भिष्‍मा, ब्रह्मोस आणि एमबीटी अर्जुन एमके टू चे प्रदर्शन यावेळी करण्‍यात आले. अत्‍याधुनिक प्रणालीचा वापर करण्‍यात आलेल्‍या शस्‍त्रास्‍त्रांचे प्रदर्शन करण्‍यात आले. शिवाय भारतीय अर्धसैनिक बल आणि एनसीसी कॅडेट्सनी बँड पथकाचे सहाय्याने शिस्‍तबद्ध संचलन करण्‍यात आले.

ऊंटावर बसुन संगिताच्‍या तालावर करण्‍यात आलेल्‍या संचलनाने उपस्‍िंथतांचे लक्ष वेधून घेतले. याबरोबरच भारतातील 13 राज्‍यांनी आपल्‍या संस्‍कृतीचे दर्शन यावेळी घडवले. देशाने केलेली अर्थिक प्रगती, औद्योगिक विकास, विज्ञानिक प्रगती याची चित्ररथातुन माहिती देण्‍यात आली. रेल्‍वे मंत्रलायाने जम्‍मू-कश्‍मीरमध्‍ये पिर पंजाल या देशातील सर्वात लांब भुयारी रेल्‍वे मार्गाची निर्मिती कशी झाली यावर अधारित चित्र रथ रेल्‍वे मंत्रालयाने सादर केला. तसेचकृषी मंत्रालयासह इतरही अनेक मंत्रालयांनी आपले चित्ररथ सादर केले. यावर्षी महाराष्‍ट्र, तामिळनाडू, असाम, अरूणाचल प्रदेश, कर्नाटक, मेघालय, जम्‍मु-कश्‍मीर, उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान व चंदिगड या राज्‍याने संचलनामध्‍ये सहभाग घेतला आहे. या रंगीततालमीचा समारोप वायु दलाच्‍या कवायतीने झाला.

पुढील स्‍लाईडवर पाहा प्रजासत्ताकदिना निमित्‍त करण्‍यात आलेल्‍या रंगीततालमीची लक्षवेधी छायाचित.....