आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Republic Day : लष्करी सामर्थ्यासह बराक ओबामांना घडले भारतीय संस्कृतीचेही दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ - ध्वजवंदनावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न झाला आहे. दुपारी बाराच्या सुमारास या सोहळ्याची सांगता झाली. लष्कराचे संचलन, देखाव्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन त्यापाठोपाठ बीएसएफच्या जवानांनी केलेल्या साहसी कसरती आणि शेवटी हवाई दलाचे फ्लायपास्ट अशा प्रकारे शिस्तबद्ध आणि नयनरम्य सोहळ्याचे ओबामा साक्षीदार बनले.
सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवरील अमर ज्योतीवर देशासाठी बलिदान केलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतः राजपथावर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामांचे स्वागत केले. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आल्यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत झाले. त्यानंतर शौर्यपुरस्कार प्राप्त शहीद जवानांच्या पत्नींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या संचलनाला सुरुवात झाली. लष्कराच्या विविध तुकड्यांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या असे संचलन केले.
प्रथमच महिलांच्या तुकड्यांचा सहभाग
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले ते तिन्ही दलांच्या महिलांच्या तुकड्यांनी केलेले संचलन. गेल्या 66 वर्षात प्रथमच महिलांच्या तुकड्यांनी संचलनामध्ये सहभाग नोंदवला. या तुकड्यांच्या संचलनाच्या वेळी उपस्थितांनीही अत्यंत उत्सफुर्तपणे या महिला जवानांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच सोहळ्याच्या अखेरीस बीएसएफच्या जवानांनी सादर केलेल्या कसरतींनाही चांगला प्रतिसाद मिळाला. मिशेल ओबामा याही या कसरती पाहून आवाक झाल्या होत्या. त्यांनी उभे राहून जवानांना दाद दिली. त्यानंतर सर्वात शेवटी झालेल्या फ्लायपास्टने सोहळ्याला उपस्थितांच्या उत्साहाला अत्युच्च स्थानापर्यंत पोहोचले. शेवटी पुन्हा राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
(लाइव्ह व्हिडिओ पाहा तिसर्‍या स्लाइडवर)
LIVE UPDATES
2.03 AM कार्यक्रमाची सांगता. सर्व व्हीव्हीआयपी पाहुणे राजपथावरून रवाना.
11. 57 AM सुखोई विमानांनी कसरती सादर केल्या.
11. 56 AM मिग 29 लढाऊ विमानांची त्यांची शक्ती दाखवली.
11. 51 AM हवाईदलाचे फ्लायपास्ट सुरू.
11.46 AM बीएसएफ जवानांनी विविध साहसी करामती दाखवल्या.
11. 44 AM राज्यांच्या देखाव्यांनंतर केंद्रीय मंत्रायलांनी देखावे सादर केले. त्यात भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवले.
10.26 AM दिव्या ए यांच्या नेतृत्त्वात सैन्याच्या महिलांच्या तुकडीने केले संचलन
10.13 AM एमआय हेलिकॉप्टरद्वारे राजपथावर फुलांचा वर्षाव.
10.11 AM राजपथावर परेडला सुरुवात.
10.00 AM राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राजपथावर पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत.
9.55 AM अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा राजपथावर पोहोचल्या. मोदींनी केले स्वागत.
9.49 AM प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी राजपथावर पोहोचले.
9.40 AM पंतप्रधानांनी अमर ज्योतीवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
9.38 AM पंतप्रधान नरेंद्र मोदी जवान ज्योतीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचले.
9.20 AM राजपथावर पाऊस थांबला.
9.18 AM दिल्लीतील भाजप मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते ध्वजारोहन.
9.08 AM दिल्लीत काही ठिकाणी रिमझीम पाऊस.
9.00 AM खराब हवामानामुळे एअर फोर्सचे फ्लाय पास्ट रद्द होण्याची शक्यता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य - डीडी नॅशनल