आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या शैक्षणिक सत्रापासून दिव्यांगांना ५% आरक्षण, मोफत शिक्षण मिळवण्याचा हक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या शैक्षणिक वर्षापासून दिव्यांगांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे.   यासंदर्भात मंजूर झालेल्या विधेयकावर सरकार आरक्षणाची नियमावली तयार करत आहे.  

आरक्षण विधेयकानुसार, ६ ते १८ वयोगटातील दिव्यांगास मोफत शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे. दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्क्यांवरून ४ टक्के आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ३ टक्क्यांवरून ५ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. दिव्यांगांना आरक्षणाचा लाभ देण्यासह अन्य नियमावली १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करत आहोत,अशी माहिती सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...