आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 रुपयांची नोट गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चलनात येणार; आरबीआयचे नोटिफिकेशन जारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई- 200 रुपयांची नोट उद्या, शुक्रवारीपासून अर्थात गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर चलनात येणार आहे. याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आज (गुरुवारी) नोटिफिकेशन जारी केले आहे. पिवळ्या रंगाची चकाकणारी ही नोट पहिल्यांदाच चलनात येत आहे.

200 रुपयांची नवी नोट चलनात येणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे नवी नोट कशी असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता ही उत्सुकता आता संपली आहे.

मिळालेली माहिती अशी की, 200 रुपयांच्या नव्या नोटांचे प्रिंटिंग सुरु आहे. दरम्यान, 18 ऑगस्टला आरबीआयने 50 रुपयांची नवी नोट चलनात आणणार असल्याची घोषणा केली होती.

लवकरच लोकप्रिय होण्याची अपेक्षा
- आरबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या मधील एकही नोट चलनात नाही. त्यामुळे 200 रुपयांची नोट बाजारात आल्यानंतर अल्पावधीतच ती लोकप्रिय ठरण्याची अपेक्षा आहे.
- आरबीआय बाजारात मोठ्या नोटांऐवजी छोट्या नोटांचा वाटा वाढण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरबीआयने गणेश चतुर्थीच्या दिवशी (25 ऑगस्ट) 200 रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठ्या नोटांची संख्या कमी-कमी करणार
- 2000 रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून बाजारात काळ्यापैशांचा व्यवहार वाढल्याच्या बातम्या आल्यानंतर आरबीआयने मोठ्या नोटांचा बाजारातील वाटा कमी करण्यास सुरुवात केली आहे. आरबीआय हळुहळु मोठ्या नोटा बाजारातून कमी करून त्याऐवजी छोट्या नोटा बाजारात जास्त आणणार आहे.
- आरबीआय 50 रुपयांचीही नोट पुन्हा आणणार आहे.
- सीमेपलिकडून बनावट नोटांचा जो कारभार चालतो त्यावरही 200 रुपयांची नोट बाजारात आल्यानंतर अंकूश लागण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा कशी असेल 200 रुपयांची नवी नोट...?
बातम्या आणखी आहेत...