आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका दौ-यासाठी आज रवाना होणार मोदी, सहा जणांवर आहे संपूर्ण दौ-याची जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल

नई दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यावर रवाना होणार आहेत. 26 सप्टेंबरला मोदी न्‍यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर पोहोचतील. या दौ-यात मोदी संयुक्‍त राष्‍ट्राच्या महासभेला संबोधित करण्याबरोबरच अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अनेक मोठ्या कंपनीच्या सीईओंची भेटही घेणार आहेत.
या कार्यक्रमाबरोबरच 28 सप्टेंबरला मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये त्यांचे ऐतिहासिक भाषण होणार आहे. मोदींचा हा दौरा यशस्वी ठरावा यासाठी भारतातील सरकारी अधिकारी, राजदूत आणि अमेरिकेत राहणारे अनेक भारतीय अथक परिश्रण घेत आहेत. त्यातही काही लोकांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशाच सहा व्यक्तींबाबत याठिकाणी जाणून घेऊया...


अजित डोभाल
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. अमेरिकेबरोबर धोरणात्मक आणि लष्करी सहकार्य याच्याशी संबंधित रुपरेषा ते तयार करत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेचीही नजर आहे. अमेरिकेच्या डिफेंस एक्सपर्ट सेंटर फॉर न्यू अमेरिकन सेक्‍युरिटीचे अध्यक्ष रिचर्ड फॉन्टेन यांच्या मते न्‍यूक्लियर डील पूर्ण करणे, संरक्षण क्षेत्रात सहकार्य आणि अफगाणिस्तानात नाटो सैनिकांना हटवणे हे विषय दोन्ही देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
फॉन्टेन यांनी या मुद्यावंर काम करण्यासाठी त्यांच्या देशातर्फे उपराष्ट्रपती जो बिडेन आणि भारताकडून अजित डोभाल यांना पसंती दर्शवली आहे. भारत-अमेरिका यांच्यातील चर्चेत दहशतवाद हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यामुळे या दौ-यात डोभाल यांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या आणखी पाच महत्त्वाच्या व्यक्तींबाबात...