आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती इराणींचे शाळेचे रेकॉर्ड दाखवण्याचा आदेश रोखला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचे दहावी व बारावी इयत्तेचे शाळेतील रेकॉर्ड दाखवण्यासंबंधी आदेशावर दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. केंद्रीय माहिती आयोगाने १७ जानेवारी रोजी सीबीएसईला रेकॉर्ड दाखवण्याचा आदेश बजावला होता.
 
न्या. संजीव सचदेवा यांनी हा आदेश दिला. सीबीएसईने म्हटले की, आरटीआय अधिनियमानुसार हे रेकॉर्ड दाखवू शकत नाही. ही तिसऱ्या पक्षाची माहिती आहे. मंडळाने वैधानिक अधिकारात त्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने रेकॉर्ड मागणारे आरटीआय अर्जदार मोहंमद नौशादुद्दीनलाही नोटीस बजावली आहे.
    
बातम्या आणखी आहेत...