आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई 12वीचा निकाल लांबणार, 10वीचा निकाल मेच्या अखेरीस किंवा जूनमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीएसई बारावीचा निकाल या वेळी लांबणार आहे. २७ मे किंवा त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे यंदा ही परीक्षा ९ दिवस उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे पुढील प्रक्रियेलाही विलंब झाला आहे.
 
गेल्या वर्षी १ मार्चला परीक्षा सुरू झाली होती आणि २१ मे रोजी निकाल जाहीर करण्यात अाला होता. यंदा निकालाबाबत संबंधित समितीची बैठकही होऊ शकलेली नाही. दरम्यान, १०वीचा निकाल मेच्या अखेरीस किंवा जूूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

नीट निकालास हायकाेर्टाची मनाई
मद्रास हायकोर्टाने बुधवारी २०१७ च्या नीटचा निकाल जाहीर करण्यास अंतरिम मनाई आदेश दिला. नीट परीक्षाच रद्द करणासंबंधीच्या याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत निकाल जाहीर करू नये, असे आदेशात नमूद आहे.
 
बातम्या आणखी आहेत...