आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन एसीबी प्रमुखांनी धमकावल्याचा दावा, माजी एसीबी प्रमुखांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : एम.के. मीणा)
नवी दिल्ली - दिल्लीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या वेळी माजी एसीबी प्रमुख एसएस यादव यांनी नवीन एसीबी प्रमुख एम.के. मीणा यांच्यावर धमकी दिल्याचा ठपका ठेवला आहे. आप सरकारने यादव यांची एसीबी प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. मीणा यांची नायब राज्यपाल नजीब जंग यांनी प्रमुखपदी नेमणूक केली आहे.

यादव यांनी दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाचे मीणा यांच्याकडून मिळणार्‍या वागणुकीवर तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. ही तक्रार आल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी ही तक्रार नजीब जंग आणि दिल्ली पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांच्याकडे पाठवली आहे. एसीबीच्या एफआयआर बुकवरून मीणा आपल्याला धमकवत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप देखील केला जात आहे. मीणा एफआयआर बुकला एसीबीच्या मुख्यालयातून बाहेर नेण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मीणा गुरुवारी रात्री यादव यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यावरून दोन्ही अधिकार्‍यांत वाद निर्माण झाला आहे. यादव यांनी मीणा यांना एफआयआर बुक देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मीणा यांनी नोटीस पाठवली होती.

‘फौजदारी गुन्हा दाखल करा’
एसीबी प्रमुख मुकेश मीणा यांनी यादव यांना धमकावल्याचा निषेध करतानाच त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी ट्विटरवरून केली आहे. मीणा यांची नेमणूक बेकायदा आहे. एसीबी प्रमुख एफआयआर रजिस्टरची मागणी का करत होते ?

आत्महत्येची धमकी चुकीची
आत्महत्येची धमकी दिल्याचा आरोप चुकीचा असल्याचे माजी एसीबी प्रमुख यादव यांनी म्हटले आहे. आपल्याला मीणा यांची भीती वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग निवडण्याची गरज वाटत नाही.
बातम्या आणखी आहेत...