आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तिधारकांना वैद्यकीय सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) संघटनेच्या 30 लाखांहून अधिक निवृत्तिधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिधारकांना वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

निवृत्तिधारकांना वैद्यकीय सुविधा देण्यासंबंधी आम्ही विचार करत असल्याची माहिती ईपीएफओच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. वैद्यकीय सुविधा पुरवताना अर्थव्यवस्थेसाठी पुरेशा पर्यायांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असेल किंवा त्यासाठी निवृत्तिवेतनातून काही रक्कम कापून घेतली जाऊ शकते. हे त्या योजनेवर सरकारचा काय रोख असेल, हे ठरणार आहे. निवृत्तिधारकांच्या वैद्यकीय सुविधांसाठी ईडीएलआय निधीचा वापर केला जाऊ शकतो.