आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Review Of Important News In Week Gone On 29th September

Sunday Spl: जनतेला \'सर्वोच्च\' आधार, राहुल गांधींचे सरकारवरच \'राईट टू रिजेक्ट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरता आठवडा सर्वोच्‍च न्‍यायालय आणि राहुल गांधींनी गाजवला. आठवड्याच्‍या सुरुवातीलाच न्‍यायालयाने सरकारला आधार कार्डाला ओळखपत्र म्‍हणून मान्‍यता देण्‍यास नकार दिला. सरकारी योजनांचा लाभ घेण्‍यासाठी आधारची आवश्‍यकता नसल्‍याचे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. त्‍यामुळे सरकारला हा मोठा धक्‍का होता. तर शुक्रवारी आणखी एक दणका दिला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय देऊन सरकारने मतदारांना 'राईट टू रिजेक्‍ट' देण्‍याचा आदेश दिला. या दोन्‍ही निर्णयांचे जनतेने स्‍वागत केले आहे. एकीकडे न्‍यायालयाने सरकारला धक्‍के दिले. तर, दुसरीकडे कॉंग्रेसचे युवराज आणि उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने काही महिन्‍यांपूर्वीच गुन्‍हेगार लोक‍प्रतिनिधींना निवडणूक लढविण्‍यापासून रोखणारा आदेश दिला होता. सरकारने हा निर्णय एका अध्‍यादेशाद्वारे फिरवला. हा अध्‍यादेश कच-यात टाकण्‍याच्‍या लायकीचा आहे, अशी कडवी प्रतिक्रीया राहुल गांधी यांनी दिली. राहुल गांधी यांच्‍या या अनपेक्षित प्रतिक्रीयेमुळे राजकारण ढवळून निघाले. विरोधकांनी यामागे कॉंग्रेसचाच कट असल्‍याचे म्‍हटले. तर अमेरिकेच्‍या दौ-यावर असलेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही धक्‍का बसला. राजकारणाबाबत बोलायचे झाल्‍यास, महाराष्‍ट्रातही काही घडामोडींची जोरदार चर्चा रंगली. शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्‍यमंत्री मनोहर जोशी यांनी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्‍याची तयारी सुरु केल्‍याची चर्चा सुरु झाली. त्‍यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्‍यात येणार नसल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यामुळे ते शिवसेनेचे धनुष्‍य खाली टाकून इंजिनावर स्‍वार होण्‍याचा विचार करत असल्‍याची चर्चा आहे.

अशा या चर्चा आणि आठवड्यातील घडामोडींचा थोडक्‍यात आढावा घेऊ या... त्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...