आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#RGforNetNeutrality: TWITTER पुन्हा राहुल गांधीची चर्चा, खिल्ली उडवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जवळपास दोन महिन्यांच्या सुटीनंतर भारतात परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आले तेव्हापासून सोशल मीडियावरील ट्रेंडिंगमध्ये आहेत. मग त्यांची रविवारची दिल्लीतील किसान रॅली असेल नाही तर, सोमवारचे लोकसभेतील भाषण. बुधवारी त्यांनी युवकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालेल्या इंटरनेटवरुन लोकसभेत सरकार गंभीर आरोप केले. ते म्हणाले, सरकार इंटरनेटचा अधिकार सर्वसामान्यांच्या हातातून हिसकावून कॉर्पोरेट्सच्या ताब्यात देत आहे. त्यानंतर ट्विटरवर #RGforNetNeutrality ट्रेंड करत होते. इतरही काही हॅशटॅग टॉप ट्रेंडिगमध्ये होते.
खिल्ली उडवली - स्तूतीही केली
सोशल मीडियावर राहुल गांधी थट्टेचा विषय नेहमीच राहिले आहेत. त्यांच्या संबंधीचे अनेक जोक्स सोशल मीडियावर शेअर केले जातात. पण या आठवड्याच्या सुरुवातीपासून राहुल गांधी त्यांच्या परिपक्व विधानांमुळे आणि शेतकरी, शेतमजूर व युवकांची बाजू घेऊन सरकारशी भांडत असल्यामुळे त्यांची स्तूती केली जात आहे. सोशल मीडिाय युजर्सचे म्हणणे आहे, की किमान या विषयांवर राहुल गांधी संसदेत आवाज तर उठवत आहेत. सोशल मीडियावरील मोठा समुह राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाने प्रभावित झाला आहे. तर दुसरीकडे काही युजर्सनी पुन्हा एकदा त्यांना विनोदी पात्र ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. युजर्सचे म्हणणे आहे, की नेट न्युट्रॅलिटीवर बोलण्याआधी त्यांनी त्यासंबंधी अधिक माहिती घेतली पाहिजे होते.
ट्विटरवर जिकडे तिकडे राहुल गांधी
एक आठवड्यापूर्वी राहुल गांधी सुटीवरुन परतल्यानंतर ट्विटरवर #RahulReturns ट्रेड करत होते. रविवारी त्यांनी किसान रॅलीला संबोधित केले तेव्हा #PappuFarce ट्रेंडिंगमध्ये होते. सोमवारी राहुल गांधी यांनी संसदेत आक्रमक भाषण केले त्यावेळी #RahulRoar आणि #RahulMeows हॅशटॅग ट्विटर टॉपमध्ये होते. बुधवारी राहुल गांधी यांनी संसदेत नेट न्यूट्रॅलिटीवर लोकसभेत आपली भूमिका मांडली. सरकार नेटचा अधिकार सर्वसामान्यांच्या हातातून काढून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर #RGforNetNeutrality टॉप हॅशटॅग मध्ये होते.
बुधवारी ट्विटरवर शेअर झालेले काही मोजके ट्विट्स

@lalitrocks
After mocking him all these years,important to give credit where it's due.Good job Rahul for taking up #RGforNetNeutrality .Hope you mean it

‏@OhTeriTo
RaGa should concentrate on Amethi where farmers are starving, rather than barking in LS over somthng he dsnt evn knw

‏@pandey29
#RGforNetNeutrality it's our fundamental right. This is the first time issue was raised in parliament.

@DoctorsTouch
Way by which rahul givin speches in parliament won't b surprised if tomorrow manmohan speaking for 1 hr in parliament #RGforNetNeutrality

‏@RusticSarcastic
Cong shud booked under child abuse 4 making RaGa do what he is not willing to, not able to and not even mature to do so #RGforNetNeutrality

‏@sushi_lost
Batman Returns !! #RGforNetNeutrality
@saifulismail
Tauba Tauba: No more jokes on RaGa. He's talking sense now. Don't know, how Thailand visit changed him that much? #RGforNetNeutrality

@RahejaVinod
#RGforNetNeutralityThe crux of the matter is RG wants POGO channel to load faster on his Tab / Phone.

@reviewero
#RGforNetNeutrality: Rajiv ji brought netneutrality to india

‏@nayachawal
Completely disconnected guy, might be talking about fisherman's net.#RGforNetNeutrality
पुढील स्लाइडमध्ये पाहा राहुल गांधी यांच्यासंदर्भातील काही पोस्टस