आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारचे सर्वात श्रीमंत मंत्री अरुण जेटली, पंतप्रधानांची संपत्ती 40 लाखांनी घटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व 44 मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. 72.10 कोटी रुपयांची संपत्ती असलेले अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. तर शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची संपत्ती सर्वात कमी 20.45 लाख रुपये आहे.
मोदींकडे 1.26 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आकड्यांचा विचार करता गेल्या पाच महिन्यांत त्यांच्या संपत्तीमध्ये 40 लाख रुपयांनी घट झाली आहे. त्यांनी ही रक्कम दान केली असल्याचे मानले जात आहे. मे महिन्यात पंतप्रधानांनी मुलींच्या कल्याणासाठी मोठी रक्कम दान केली. त्यामुळेच त्यांची संपत्ती घटली असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती देण्याबरोबरच सध्या 64 सरकारी अधिकारी पंतप्रधानांसाठी पर्सनल स्‍टाफ म्हणून काम करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

कोट्यधीश मंत्र्यांची यादी
गृहमंत्री राजनाथ सिंह : 2.56
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज: 2.73
कायदा व दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद : 14.91
परिवहन मंत्री नितीन गडकरी : 3.34
जलसंपदा मंत्री उमा भारती : 1.62
आदिवासी मंत्री जुएल उरांव : 1.77
माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर : 1.05
कृषीमंत्री राधामोहन सिंह : 2.47
मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी : 4.15
वाणिज्‍य मंत्री निर्मला सीतारमण : 1.03
कोळसा व ऊर्जा मंत्री पीयूष गोयल : 31.67
महिला आणि बाल कल्याण मंत्री मेनका गांधी : 37.68
पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंह : 2.67
अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला : 29.70
(सर्व आकडे कोटींमध्ये)

कोट्यधीश नसणारे मंत्री
लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र : 72.11
इशान्येकडील राज्यांचे मंत्री जनरल व्ही. के. सिंह : 68.76
गृहराज्य मंत्री किरण रिजिजू : 66.65
ग्राहक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान : 39.88
खाण, इस्पात क कामगार मंत्री नरेंद्र सिंह तोमर : 44.90
आरोग्य मंत्री हषर्वर्धन : 48.54
रसायन व खते मंत्री अनंत कुमार: 60.62
(सर्व आकडे लाखांत)