आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमार \'फेडरल फ्रंट\' बनविण्‍याच्‍या तयारीत, मन वळविण्‍यासाठी अडवाणींचा फोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींच्‍या निवडीबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. याचे एनडीएवर परिणाम दिसू लागले आहेत. एनडीएतील एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष असलेल्‍या जेडीयूने भाजपची साथ द्यावी की नाही, यावर विचार सुरु केला आहे. जेडीयूचे नेते आणि‍ बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांना मोदीची भाजपच्‍या प्रचार समितीचे अध्‍यक्ष म्‍हणून झालेली निवड मान्‍य नाही. त्‍यांनी आता पक्षाच्‍या नेत्‍यांसोबत झालेल्‍या बैठकीत निवडणूकीसाठी सज्‍ज राहण्‍यास सांगितले आहे. परंतु, दुसरी महत्त्वाची बाब म्‍हणजे जेडीयुमध्‍ये भाजपसोबत संबंध तोडण्‍यावर एकमत झालेले आहे. मोदींच्‍या नावाकडे इशारा करताना जेडीयूचे सरचिटणीस के. सी. त्‍यागी यांनी सांगितले की, ज्‍या व्‍यक्तीवर आमचा आक्षेप आहे, त्‍याला पुढे करण्‍यात आल्‍यास एनडीएमध्‍ये राहण्‍याबाबत विचार करावा लागेल.

जेडीयू वेगळीच चूल मांडण्‍याच्‍या तयारीत असतानाच लालकृष्‍ण अडवाणी यांनी आज बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार तसेच एनडीएचे समन्‍वयक आणि जेडीयूचे प्रमुख शरद यादव यांच्‍यासोबत दूरध्‍वनीवरुन चर्चा केली. मोदींच्‍या निवडीमुळे नाराज झालेल्‍या जेडीयूला मनविण्‍याचे काम अडवाणी यांच्‍याकडे सोपविण्‍यात आल्‍याचे बोलले जात आहे. अडवाणींनी दोन्‍ही नेत्‍यांसोबत चर्चा करताना एनडीए बळकट करण्‍याचा मुद्दा लावून धरल्‍याचे सुत्रांनी सांगितले.


भाजपवर मात्र जेडीयूच्‍या दबावाचा परिणाम होताना दिसत नाही. आघाडीत राहणे किंवा बाहेर पडणे, हा जेडीयूचा निर्णय असेल. याशिवाय बिजू जनता दलानेही वेगळा पर्याय स्विकारण्‍याचे संकेत दिले आहेत. यूपीए आणि एनडीएपासून दूर राहण्‍याचे संकेत बीजेडीचे नेते आणि ओडीशाचे मुख्‍यमंत्री नवीन पटनायक यांनी दिले होते. त्‍यामुळे पुन्‍हा तिस-या आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. नितीश कुमार 'फेडरल फ्रंट' उभारण्‍याच्‍या तयारीत आहेत. यासाठी त्‍यांनी पश्चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍याशीही चर्चा केली आहे. स्‍वतः ममता बॅनर्जी यांनी त्‍यास दुजोरा दिला आहे. त्‍यांनी सांगितले की, यासंदर्भात नवीन पटनायक यांच्‍यासोबतही चर्चा केली असून लवकरच या नेत्‍यांसोबत बैठक घेण्‍यात येणार आहे. त्‍यात सविस्‍तर चर्चा करण्‍यात येईल.

भाजप आणि जेडीयूमध्‍ये निर्माण झालेल्‍या दुराव्‍यानंतर बिहारचे माजी मुख्‍यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमारांवर टीका केली आहे. त्‍यांनी 'लव्ह मॅरेज' केले होते. त्‍यामुळे 'डिव्‍होर्स' होणारच होता, अशी टीका लालुनी केली आहे.

नितीश कुमार तिस-या आघाडीच्‍या तयारीत, 15 ला घेणार भाजपसोबत काडीमोड? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..