नवी दिल्ली - स्वतंत्र विदर्भाबाबतचा ‘निर्णय योग्यवेळी’ घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. ते राजधानीत एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.भाजप छोट्या राज्यांच्या निर्मितीच्या बाजूने आहे. या मुद्द्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा राहिला आहे. परंतु स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रश्न येतो. तेव्हा पक्षाच्या विशेष अधिकार कक्षेत हा विषय येतो. म्हणूनच केंद्र सरकार आणि पक्षाचे केंद्रीय मंडळ त्यावर विचार करेल. तीच योग्य वेळ असेल व तो निर्णय पक्षच घेईल, असे त्यांनी सांगितले.
तुम्ही शिवसेनेचे मन कसे वळवणार असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही २५ वर्षांपासून सोबत आहोत. कठीण परिस्थितीतूनच मार्ग निघत असतो, असे सूचकपणे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे विभाजन केले जाणार नाही, अशी अट मान्य केल्यानंतरच शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.