आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचल: कॉन्ट्रॅक्टर, विजेलिस अधिकार्‍याच्या संभाषणात रिजिजूंचा 17 वेळा उल्लेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशातील टेंगो आणि बिगबॉग नदीवर उभारण्यात येणार्‍या हाइड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये सुमारे 450 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची एक ऑडिओ टेप समोर आली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे नातेवाईक तसेच कॉन्ट्रॅक्टर गोबोई रिजिजू यांचे आणि व्हिजिलेंसचे सतीश वर्मा यांच्या संभाषणाची ही टेप असल्याचा दावा 'द इंडियन एक्सप्रेस'ने केला आहे.

29 मिनिटांच्या ऑडिओ टेपमध्ये गोबोई यांनी तब्बल 17 वेळा 'भैया' असा किरण रिजिजू यांचा उल्लेख केला आहे. 'सर मी ऐकले आहे की तुमचे प्रमोशन होणार आहे. भैयासाठी (रिजिजू) काही काम असेल तर सांगा', असे गोबोई यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना रिजिजू यांनी सांगितले की, प्रोजेक्टचे काम आणि त्यांची पेमेंट हे काँग्रेसच्या काळात झाले आहे. माझ्यावर केले जात असलेले आरोप तथ्यहीन आहेत. आरोप करणार्‍यांनी देशाची माफी मागावी.

काँग्रेसने राज्यसभेत मांडलेल्या प्रस्तावात रिजिजू यांच्यावर भ्रष्‍टाचारा आरोप करण्‍यात आला आहे. यावरुन विरोधकांंनी राज्यसभेत प्रचंंड गदारोळ केला. रिजिजू यांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूूब करण्‍यात आले.

'ट्विटर'वर पोस्ट केले पत्र...
- रिजिजू यांनी ऊर्जा मंत्रालयाला लिहिलेले पत्र 'ट्विटर'वर पोस्ट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, माझ्यावर होत असलेले आरोप सुढवुद्धीने करण्यात येत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. गरिबांना मदत करणे भ्रष्टाचार आहे का? असा सवालही रिजिजू यांनी केला आहे.
- प्रोजेक्टचे सर्व काम आणि पेमेन्ट काँग्रेस सरकारच्या काळात झाले आहे. त्यांनी आधी देशाची माफी मागायला हवी.
- खासदार या नात्याने स्थानिक लोक मला सहकार्य करतात. तसेच माझ्याकडे मदतीसाठी येतात.
- काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी थेट मला आव्हान द्यावे. माझ्यावर असे खोटेनाटे आरोप करू नयेत.
- काँग्रेसचे आरोप निराधार आहेत. त्यात काहीही तथ्य नाही.
- काँग्रेसने माझ्यावर आरोप करून मोठी चूक केली आहे. याची त्यांना किंमत चुकवावी लागेल.
- काही मीडियावाले चुकीचे वृत्त प्रसिद्ध करत आहे. पण, अखेर सत्याचाच ‍विजय होईल.
अहवालात रिजिजूंच्या नातेवाईकाच्या नावाचा उल्लेख
- 'द इंडियन एक्सप्रेस'नुसार विजिलेंसचे अधिकारी सतीश वर्मा यांनी 129 पानांचा अहवाल तयार केला होता. यात नॉर्थ-ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे (NEEPCO) चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर (सीएमडी) यांच्यासह मोठ्या पदावर बसलेल्या अनेक अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारासाठी जबाबदार ठरवले आहे. या प्रकरणात 450 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... किरेन रिजिजू यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री यांना पाठविलेले पत्र ट्विटरवर पोस्ट केले आहे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...