आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक ठिकाणी मुर्ख भेटतातच, विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला IAS म्हणाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महिला आयएएस अधिकारी रिजू बाफना यांनी टाकलेली फेसबुक पोस्ट 48 तासांच्या आत व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की प्रत्येक ठिकाणी मुर्ख भेटतातच. या देशात कोणतीही व्यक्ती महिला म्हणून जन्मायला येऊ नये, अशी मी प्रार्थना करते.
अश्लिल मेसेज पाठविल्या प्रकरणी आयएएस अधिकारी रिजू बाफना यांनी राज्य मानवाधिकार आयोगाच्या सदस्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या सदस्याला निलंबित करण्यात आले. पण हा शेवट समाधानकारक नसल्याने रिजू यांनी म्हटले आहे.
घडलेली घटना न्यायालयासमोर मांडताना रिजू बाफना यांनी विनंती केली होती, की वकीलांसह इतरांना कोर्टाच्या खोलीबाहेर पाठविण्यात यावे. त्यांच्यासमोर संपूर्ण घटना मांडणे अशक्य आहे. त्यावर वकीलांनी आक्षेप घेत म्हटले होते, की तुम्ही तुमच्या कार्यालयात अधिकारी आहात. पण हे कोर्ट आहे. तुम्ही येथे अधिकारी नाहीत.
मी माझ्या समस्या न्यायाधीशांसमोर मांडल्या. बाफना म्हणाल्या, की विनयभंगाप्रकरणी एखादी महिला स्टेटमेंट देत असेल तर इतर पुरुष उपस्थित नसावे याकडे कोर्टाने लक्ष द्यायला हवे. त्यावर ते म्हणाले, की तू तरुण आहेस. त्यामुळे अशा बाबींची मागणी करीत आहेस.
महिलांच्या समस्यांवर देश असंवेदनशील आहे. या देशात कोणतीही व्यक्ती महिला म्हणून जन्मायला येऊ नये. प्रत्येक ठिकाणी मुर्खच भेटतात, असेही बाफना म्हणाला आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा रिजू बाफना यांची फेसबुक पोस्ट....
बातम्या आणखी आहेत...