आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर खानदानातील प्रत्येक पिढीची निवड गुणवत्तेवर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर ऋषी यांचे Tweet

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या घराणेशाहीच्या वक्तव्यावर अभिनेते ऋषीकपूर यांनी टीका केली आहे. कपूर यांनी ट्विट करुन म्हटले, की सन्मान कर्तृत्वाने, मेहनतीने कमावला जातो, गुंडागर्दीने नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मंगळवारी कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात विद्यार्थी आणि विचारवंतांशी संवाद साधला. तेव्हा एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले होते की घराणेशाही भारत देशाचीच समस्या आहे. भारतातील सर्वच राजकीय पक्ष आणि चित्रपट, उद्योग क्षेत्रात हेच सुरु आहे. 
 
ऋषी कपूर यांनी एकानंतर एक केले तीन ट्विट 
 
पहिले ट्विट
- ऋषीकपूर यांनी लिहिले, 'राहुल गांधी, भारतीय सिनेमाच्या 106 वर्षांच्या इतिहासात कपूरांनी 90 वर्षे आपले योगदान दिले आहे. प्रत्येक पिढीला जनतेने त्यांच्या गुणवत्तेवर निवडले होते.'
 
दुसरे ट्विट
- ऋषी यांनी लिहिले, 'तुम्हाला तुमच्या कामाने आणि कठोर मेहनतीने लोकांकडून सन्मान मिळत असतो, तो जबरदस्तीने किंवा गुंडागर्दीने मिळत नाही.'
 
तिसरे ट्विट 
- त्यांनी लिहिले, 'देवाच्या दयेने आमची चौथी पिढी सध्या इंडस्ट्रीमध्ये आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि रणबीर कपूर. या सर्वांना सोडून तुम्ही दुसरेचा काही पाहिले. घराणेशाहीच्या नावावर लोकांना चुकीचे काही सांगू नका.'
 
काय म्हणाले होते राहुल गांधी? 
घराणेशाहीचे राजकारण एक समस्याच
- भारतात घराणेशाही एक राजकीय समस्या असल्याचे सांगून अखिलेश असोत वा स्टॅलिन, अभिषेक बच्चन असो किंवा अंबानी, अनेक प्रसिद्ध भारतीय कुटुंबात ही घराणेशाही आहे, असे राहुल म्हणाले. भारतात वारसा हक्काने खूप काही चालते. मात्र, या लोकांत क्षमता आहे की नाही हा मुख्य प्रश्न असतो, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...