आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम, पीआेएसवर सायबर हल्ल्याचा धोका; सायबर सुरक्षा संस्थेचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीनंतर देशात वाढत्या रोकडरहित व्यवहारात सायबर हल्ल्याचा धोकाही वाढला आहे. मायक्रो एटीएम व पीओएस(पॉइंट ऑफ सेल) मशीन्सना धोका होऊ शकतो. यामध्ये क्रेडिट/डेबिट कार्ड््सचा डेटा चोरी होऊ शकतो. देशातील सुरक्षा संस्था सीईआरटी - इनने हा इशारा दिला आहे.

संस्थेने सर्व ग्राहक, बँकर्स व व्यावसायिकांना स्किमिंग व मालवेअरच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचे उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे. मायक्रो एटीएम व पीओएससाठी दोन वेगवेगळे सल्ले जारी केले. सीईआरटी -इनचा इशारा महत्त्वपूर्ण मानला जातो. गेल्या ऑक्टोबर महिन्यात विविध बँकांच्या ३२ लाख कार्ड््सचा डेटा चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले होते. हॅकर्सने सुमारे १.३० कोटी रुपये चोरले होते. हॅकिंग, फिशिंग हल्ल्याचा सामना करणे व भारतीय इंटरनेट डोमेनची सुरक्षा प्रणाली बळकट करण्यासाठी सीईआरटी-इन नोडल एजन्सी आहे.

२०, ५० च्या नोटा
२० व ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात लवकरच येत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. या नोटांवर चढत्या क्रमाच्या आकारात क्रमांक असतील. जुन्या २० व ५० च्या नोटांची वैधता कायम असेल.
बातम्या आणखी आहेत...