आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Rage: Impatient Motorists Beat Delhi Man To Death, One Held

मुलांसमोर झालेल्या मारहाणीत पिता ठार, कारला धडक दिल्याचे कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीत तुर्कमन गेट भागात एका दुचाकीस्वाराने कारला धडक दिल्यानंतर कारमधील चौघांनी केलेल्या मारहाणीत या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या दुचाकीस्वाराच्या दोन लहान मुलांसमोर ही बेदम मारहाण करण्यात आली. या मुलांच्या डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री हा भयंकर प्रकार घडला.

शाहनवाज आपल्या दोन मुलांसह दुचाकीवरून घरी परतत असताना तुर्कमन गेट भागात अचानक समोर आलेल्या कारला त्यांची धडक झाली. यानंतर कारमधील चौघांनी शाहनवाज यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊत चौघांनी शाहनवाज यांना बेदम मारहाण केली. जखमी शाहनवाज यांना रुग्णालयात हलवण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना निदर्शने करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

एका स्थानिक नागरिकाने सांगितले की शाहनवाजला मारहाण होत असताना पोलिस त्या ठिकाणी उपस्थित होते. पण त्यांनी हा सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रण तपासत आहेत.