आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Safety Bill News In Marathi, Gopinath Munde, Divya Marathi

रस्ते सुरक्षा विधेयकासाठी आणखी किती प्रतीक्षा?, देशात दर तासाला 16 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रस्ते अपघातात केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे 3 जून रोजी निधन झाले. त्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 45 दिवसांत रस्ते सुरक्षेसंदर्भात नवे विधेयक आणले जाईल, अशी घोषणा सहा जून रोजी केली होती. घोषणा होऊन 45 दिवस उलटून गेले तरी या विधेयकाची घोषणा प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही; परंतु या अनुषंगाने विविध देशांच्या मोटार वाहनविषयक तसेच रस्ते सुरक्षा कायद्यांतील तरतुदींचा अभ्यास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशात सध्या दर तासाला रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू होतो, तर 58 लोक जखमी होतात. राजधानी दिल्लीत दरदिवसाला पाच जणांचा अपघाती मृत्यू होतो. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. 3 जून रोजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे मुंडे यांचे निधन झाले होते. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. रस्ता सुरक्षेला धरून मानके निश्चित करणा-या सेंटर फॉर सायन्स एन्व्हायर्नमेंटलने देशव्यापी रस्ते सुरक्षा ऑडिट केले. त्यात वरील चित्र स्पष्ट झाले. देशात विविध शहरांत रस्ते सुरक्षा मानकांचे पालन होत नाही. विविध पातळ्यांवर सुरक्षा व वाहतूक नियमांचे दुर्लक्ष केले जाणे, अप्रशिक्षित वाहन चालकांकडून बेदरकार वाहने चालवणे आदी घटनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विविध देशांच्या कायद्यांचा अभ्यास
नवे रस्ते सुरक्षा विधेयक युनायटेड किंगडमच्या (यूके) ट्रॅफिक मॅनेजमेंट अ‍ॅक्टच्या नियमांवर आधारित असेल, असे संकेत मिळाले आहेत. अर्थात, परिवहन मंत्रालयाकडूप ब्रिटनच्या कायद्याशिवाय अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, सिंगापूर आदी देशांच्या मोटार वाहन कायद्यांचा अभ्यास केला जात आहे. विविध देशांच्या कायद्यांचा व त्यातील कठोर तरतुदींचा अभ्यास करून त्यातून योग्य ते घेऊन नवा परिवहन कायदा तयार केला जाईल, सुरक्षा मानके अधिक कठोर केले जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले होते.

2000 रुपये किमान दंड नियम मोडल्यास
नव्या विधेयकात कायद्याचे उल्लंघन केल्यास कमीत कमी 2 हजार रुपयांचा दंड प्रस्तावित केला जाऊ शकतो. या विधेयकात बाइक रेसिंग तसेच एकापेक्षा जास्त वाहन परवाने ठेवणा-यालाही दंड केला जाऊ शकतो.

खराब रस्त्यांचीही जबाबदारी निश्चित
रस्ते अपघातांचे मुख्य कारण हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, वेगाने तसेच दारू पिऊन गाडी चालवणे ही आहेत.. त्याला आळा घालण्यासाठी नव्या विधेयकात तरतूद असेल. बससह सर्व प्रवासी गाड्यांमध्ये समोरच्या दोन आसनांवर एअरबॅग तसेच सर्व दुचाकींसाठी डिस्क ब्रेक अनिवार्य करण्यात येईल. सध्या केवळ हायस्पीड दुचाकी वाहनांतच डिस्क ब्रेक व महागड्या कारमध्येच एअरबॅगची सुविधा असते.