आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा विधेयक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील वाढत्या रस्ते अपघातांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार लवकरच रस्ते सुरक्षा विधेयक आणणार असल्याचे संकेत दिले. 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना अपघातील जखमींसाठी देशभरात कॅशलेस उपचार सुविधा लागू केली जाईल, असेही सांगितले. ते म्हणाले की, सरकार राष्ट्रीय रस्ते सुरक्षा धोरण व रस्ते सुरक्षा कृती योजनेवर सरकार काम करत आहे. रस्ते अपघातांमधील असंवेदनशील बाबींचा उल्लेख करताना मोदींनी िदल्लीत एका अपघातात मृत्यू पावलेल्या स्कुटर चालकाचे उदाहरण दिले. अपघातानंतर जखमी व्यक्ती १० मिनिटांपर्यंत रस्त्यावर तडफडत होती. वेळेवर मदत मिळाली नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक तृतीयांश लोक हे १५ ते २५ वर्षे वयाचे असतात. मला अनेक लोकांनी लिहून कळवले होते की तुम्ही रस्ते सुरक्षेच्या मुद्यावर बोला. त्यांची चिंता योग्यच आहे. सरकारला यावर काम करावेच लागेल. परंतु मी माता- पित्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांना रस्ते सुरक्षेशी संबंधित नियम व बाबी जरूर समजून सांगाव्यात व त्यांचे पालनही करायला शिकवावे.