नवी दिल्ली - दुरसंचार नियामक ट्रायने ग्राहकांना दिलासा देत रोमिंगमधील लोकल एसएमएसच्या दरात एक रुपयाची कपात करुन 25 पैसे केली आहे. रोमिंगमधील इनकमिंग कॉलचा दर 45 पैसे प्रती मिनीट करण्यात आला आहे. तर आउटगोइंग लोकल कॉल दर 1 रुपया प्रती मिनीटावरुन 80 पैसे करण्यात आला आहे. ट्रायने म्हटले आहे, की नॅशनल रोमिंग सर्व्हिसचे नवे दर एक मे पासून लागू केले जातील.
ट्रायने म्हटले आहे, की इंटर सर्कल कॉल दर 1.15 रुपये राहातील. त्यासोबतच ट्रायने म्हटले आहे, की एक निश्चित रक्कम भरल्यानंतर रोमिंग दरम्यान इनकमिंग व्हाइस कॉल मोफत केले जातील. ट्रायने ऑपरेटर्सना ग्राहकांसाठी स्पेशल रोमिंग टेरिफ प्लॅन सादर करण्यास सांगितला आहे.