आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery In Actress And Beauty Queen Sonal Chauhan House News In Marathi

चोरट्यांनी देवपूजा करून टाकला ब्यूटी क्वीनच्या घरात दरोडा, क्राऊनही लांबवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली एनसीआरमध्ये बॉलिवुड अभिनेत्री सोनल चौहानच्या घरात चोरी करण्यार्‍या चोरट्यांना पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून लाखोंरुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
नोएडा येथील सोनलच्या घरात बुधवारी चोरी झाली होती. रोख रकमेसह काही दागिने आणि सोनलचा मिस वर्ल्ड टूरिझमचा मुकुट देखील चोरट्यांनी लांबवला होता. 2005 मध्ये सोनलला 'मिस वर्ल्ड टूरिझम' पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले होते. सोनलच्या घरातून एकूण 40 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला होता.

चोरी करण्‍यापूर्वी चोर करते होते आधी पूजा...
सोनलच्या घरात दरोडा घालणार्‍या चोरट्यांना पोलिसांनी अटक केले आहे. बिजेंद्र दुबे, अनिल दुबे आणि प्रवीण दुबे अशी चोरट्‍यांची नावे असून चोरी करण्‍यापूर्वी तिघे घरात पूजा करायचे, अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. चोरी झाली तेव्हा सोनलच्या देवघरात लाईट लागलेले होते. चोरांनी सोनलच्या घरात चोरी करण्‍यापूर्वी देवपूजा केली होती. चोरी केलेल्या ऐवजपैकी 11 टक्के देवीच्या नावाने खर्च करत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी सोनलच्या भावाने गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनलच्या घरात चोरी झाली तेव्हा तिची आई शिवानी चौहान आणि वहिनी स्तुति चौहान बाजारात गेल्या होत्या. सोनलच्या घरातून 3.5 लाख रोख आणि सोनलचा मुकुट आणि दा‍गिने चोरट्यांनी लांबवल्याचे विक्रम चौहानने (सोनलचा भाऊ) सांगितले. सोनल सध्या देशाबाहेर आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पोलिसांनी जप्त केलेला सोनलचा मुकुट...