नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई रॉबर्ट वढेरा यांच्यावर जमीन व्यवहारासंदर्भात काही आरोप केले जात आहे. राजस्थान आणि हरियाणा सरकार त्यांची चौकशी करीत आहे. या संदर्भात काही वेळ शांत बसलेल्या वढेरा यांनी आता माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, माझे नाते एका राजकीय घराण्याशी आहे. त्यामुळे माझा एक राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जात आहे.
वाचा मुलाखतीत काय म्हणाले रॉबर्ट वढेरा-
तुमच्या विरुद्ध अनेक आरोप केले जात आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ?
माझ्यासाठी टीका हा कदाचित खूप मऊ शब्द आहे. माझा तर खुप दिवसांपासून राजकारणात बळी जात आहे. ज्या प्रकारे माझे चरित्र चित्रण केले जात आहे. ते मला सहन करणे शक्य होत नाही. माझ्या बद्धल चुकीची माहिती प्रसारित करून, माझी प्रतिमा मलिन करण्याचे ष्ाडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे माझी सत्य सुद्धा ऐकण्याची इच्छा उरलेली नाही.
परंतु, जमीन जमीन व्यवहारावरून खुप आरोप केले जात आहे?
माझा एक प्रकारे राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. जे माझ्या सोबत असे वागत आहे, त्यांचा उद्धेश लोकांचे लक्ष विचलित करणे हा आहे. मी जे काही केले ते जनतेसमोर आहे. माध्यमेही ज्या माहितीच्या आधारे हे अभियान चालवत आहे, ती सर्व माहिती मी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज व इतर संस्थेला दिली आहे. मी नफ्यात जमीनीची विक्री केली आहे, असे माझ्या बद्धल बोलले जात आहे. परंतु ज्या परिसरात मी ज्या किमतीत जमीनीची विक्री केली आहे, त्या किेंमतीत इतर लोकांनी देखील विक्री केली आहे. त्यांच्या व्यवहाराची कधीही चर्चा होत नाही. परंतु, मी नेहमी कायद्याने आणि पारदर्शकपणे व्यवहार करतो. पण मलाच का दोषी पकडले जाते ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
तुमच्या लाइफ स्टाइलवर खुप चर्चा होत आहे ?
मी कुर्ता, पायजामा आणि चप्पल अशा साध्या वेशात राहलो असतो, तर कदाचित लोकांचे विचार माझ्याविषयी वेगळे झाले असते. पण मी जसा आहे तसाच राहलो आहे. सुरवातीच्या काळात मी महागड्या कार चालवत होतो. चांगल्या कपड्यांमध्ये राहत होतो. 80 च्या दशकात आमचा एकमात्र परिवार होता ज्यांच्याकडे टोयाटो होती. आम्हालाही या बाबीवर गर्व होता. त्यामुळे आम्ही या गाडीला गॅरेजमध्ये लपवून ठेवले नाही. त्यामुळे दुसरे जर मला असे पाहू इच्छितात तर मी का बदलू. मी आजही तसाच आहे. लोक मला अतीशिल्लक, गर्विष्ठ म्हणू शकतात कारण मी दांभिक नाही. जेव्हाही कधी मला कामाच्या निमित्ताने जुन्या दिल्लीमध्ये जावे लागते, तेव्हा मी ऑटो रिक्षामध्ये जातो. काही गरीब संस्थांना मदत करायची असल्यास करतो. मी त्या लोकांपेकी नाही जे
आपली विशेष प्रतिमा तयार करण्यासाठी सेल्फी घेऊन पोस्ट करतात. मी माझे सामान्य जीवन जगतो त्याचा पसारा मांडत नाही. मागील काही वर्षांमध्ये माझी विचारधारणा खुप मजबूत झाली आहे. मी कधी माझ्या पत्नीच्या परिवारातील नावांचा दुरूपयोग केला नाही आणि करणारही नाही.
आपला परिवार, विशेष म्हणजे मुलांच्या प्रतिक्रिया काय असतात?
माझे मुलं एवढे मोठे आहेत की ते सर्व वाचतात समजतात. नकारात्कम प्रचाराचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडतो. आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीपासून वाचवू शकत नाही. पण आम्ही त्यांना एवढे शिकवू शकतो या परिस्थितीचा सामना कसा करायला हवा. माझ्या मुलांचे बालपण एवढे निर्धास्त आणि आनंदी नाही, जेवढे माझे होते. एक दिवस माझ्या मुलाने मला विचारले की, तुमच्या विषयी एवढे काही बोलले जाते तरीही आपण काही उत्तर का देत नाही? तेव्हा मी विचार केला की, माझ्याविषयी एवढा अपप्रचार होत असताना मी शांत बसणे योग्य नाही. एक दिवस मी माझ्या भावना फेसबुकवर व्यक्त करण्याचे ठरवलेही होते. व्यक्त होणा-या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही लिहीले.
विमानतळावरील व्हीव्हीआयपी ट्रीटमेंटबाबत काय म्हणाल?
हे तर सरकारने पसरवले आहे की, मी विमानतळावर व्हीव्हीआयपी दर्जाचा आनंद घेत आहे. मी फेसबुकवरही याचे उत्तर दिले होते. मला वाटते की, काही कमी लोकं असले तरी त्यांना माहित होते की, मी कधी व्हीव्हीआयपी दर्जाचा आनंद घेतला नाही. मी विमानतळावर जेव्हाही जात होतो, तेव्हा हा सर्व प्रकार पाहून मला लाज वाटत होती. जेव्हा पहिल्यांदा मी हे सर्व पाहिले. तेव्हा मी घाबरलो होतो. सुरक्षा संस्थांनी त्यांच्या सुविधेसाठी हे सर्व केले होते. मी कोणता व्हीव्हीआयपी नाही, ना मला कोण्या सुविधेची गरज वाटत नाही.
तुमचे मुलं आणि त्याच्या संगोपनाबाबत काही सांगा?
मी माझ्या मुलांच्या संगोपनाबाबत खुप गंभीर आहे. मी आणि माझी पत्नी आमच्या दोघांचेही मत आहे की, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मुलांना सामान्य बालपण जगण्याची संधी मिळायला हवी. मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. हा कठोर निर्णय होता. पण आम्हाला वाटते की, तो सामान्य परिस्थितीत मोठा व्हायला पाहिजे. रेहान 15 वर्षाचा आहे. तो फुटबॉल खेळतो आणि शूटरही आहे. वाइल्डलाइफ आणि फोटोग्राफीची त्याला आवड आहे. मुलगी मिराया 13 वर्षांची आहे. ती दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहे. राज्यस्तरावर ती बास्केटबॉल खेळते. मी त्यांच्या शाळेतील सर्व कार्यक्रम खास करून पालक- शिक्षकांच्या बैठकांना उपस्थित असतो. यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही चांगले मित्र आहोत. मुलांकडून मला खुप शक्ती मिळते, त्यांच्यामुळेच माझ्या चेह-यावर हास्य आहे.
आपल्याविषयी असलेला समज आणि व्यक्तिमत्वामध्ये एवढा फरक का?
माझ्याविषयी लोकांमध्ये असलेला समज सत्यापासून खुप दूर आहे. असे वाटते की, माझ्या व्यक्तिमत्वाविषयी असलेला समज हा राजकीय अजेंडापासून जास्त प्रभावीत आहे. माझी पार्श्वभूमी सामान्य आहे. माझ्या वडिलांनी स्वत:च्या हिंमतीवर बिझनेस सुरू केला होता. माझी आई शिक्षीका होती. आमची सामाजिक आणि आर्थिक स्थिती उत्तम होती. माझ्या वडिलांना बिझनेस क्षेत्रातून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. प्रियंकासोबत लग्न केल्यानंतर माझा अनुभव वेगळा राहिला आहे. पण मी माझे मुल्य कधी सोडले नाहीत. सामान्य लोकांप्रमाणे राहण्याचे संस्कार माझ्यावर बालपणीच झाले आहेत. ते आजही कायम आहेत. मला आपल्या लोकांसोबत नेहमी सोयिस्कर असल्याचे वाटते. मग त्यांची पार्श्वभूमी कशीही असो. जिवनात विनोदाचा बोध होणे फार महत्त्वाचे आहे. अन्यथा ज्या स्थितीमध्ये मी राहतो, त्यामध्ये जगणे कठीण आहे.
हरियाणा आणि राजस्थानमध्ये आपल्या बिझनेसबाबतच्या सौद्यांची तपासणी होत आहे ? या स्थितीवर तुमची प्रतिक्रीया काय?
जसे मी आधीही काही सांगितले आहे. हे प्रकरण साफ-साफ राजकीय हाडवैराच्या भावनेतून आहे. हो, हरियाणामध्ये एक तपास सुरू आहे. मला माध्यमांमधुनच माहिती मिळाली. पण आतापर्यंत कोणतीही नोटीस मिळाली नाही. जेव्हा नोटीस मिळेल तेव्हा त्याचे उत्तर दिले जाईल. ही कायद्याची बाब आहे, त्यामुळे यावर आता काही बोलू इच्छित नाही.
काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला तुम्ही धक्का दिला होता ?
ते सर्व काही अचानक झाले होते. मी एका जिमच्या उद्घाटनाला गेलो होतो. माझा नेहमी प्रयत्न असतो की, माझ्यामुळे आयोजक किंवा पाहुण्यांना काही त्रास होऊ नये. त्या पत्रकार महाशयांनी किती आक्रमक पद्धतीने प्रश्न विचारला हा भाग टीव्हीवाल्यांनी दाखवला नाही. तेव्हा मी जास्त उत्तेजित झालो होतो. त्याविषयी मला खेद आहे. पण मीही माणुसच आहे.
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाबद्दल काय वाटते?
मी राजकारणापासून दूर सामान्य नागरिकासारखा राहतो. मला वाटते की, देशात सध्या सामाजिक असहिष्णुता पाहून खुप दु:ख होत आहे. भारत आपल्या सर्वांचा देश आहे. कोणतीही जात, धर्म, संस्कृती असो. युवकांना आवडी निवडी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र असायला हवे. यातच देशाचा विकास आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र, धर्म व पूजाविधीच्या अधिकारावर बंधने आणल्यास देशाची प्रगती थांबू शकते.