आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robert Vadra Had Property Worth 324 Crore In 2012, Says Wall Street

वढेरा यांची 2012 मध्ये 324 कोटींची संपत्ती; वॉल स्ट्रीट जर्नलचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रॉबर्ट वढेरा यांच्याकडे 2012 मध्ये 252 कोटींचा जमीनजुमला होता. त्याच वर्षी त्यांनी 72 कोटी रुपयांची संपत्ती विकली होती. अर्थात एकूण संपत्ती 324 कोटी रुपयांची होती. गांधी परिवारामुळेच त्यांना एवढी संपत्ती गोळा करता आली, असा दावा अमेरिकी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे.

भारतातील संपत्ती तज्ज्ञ, वढेरा यांच्या कंपनीकडून देण्यात आलेल्या आकडेवारीच्या साह्याने ही माहिती दिली आहे. 2004 मध्ये यूपीए सरकार स्थापन झाले, तेव्हा वढेरा ज्वेलरीचा छोटा-मोठा व्यवसाय करत होते. 2007 मध्ये त्यांनी सुमारे 1.20 लाख रुपये किमतीची स्कायलाइट कंपनी स्थापन केली आणि प्रॉपर्टी बिझनेसमध्ये दाखल झाले. त्यांनी 2008 मध्ये गुडगावात साडेतीन एकर जमीन खरेदी केली होती. त्याची किंमत 6.65 कोटी रुपये आहे. दोन महिन्यांनंतर हरियाणातील काँग्रेस सरकारकडे शेतजमीन व्यावसायिक जमिनीत रूपांतरित करण्याची मागणी केली होती. केवळ 18 दिवसांत त्यांना मंजुरीदेखील मिळाली होती. त्यामुळे जमिनीचे भाव प्रचंड वाढले. पुढली चार वर्षे डीएलएफने वढेरा यांच्या कंपनीत गुंतवणूक केली. 2012 मध्ये डीएलएफने गुडगाव येथे असलेली संपत्ती 58.55 कोटी रुपयांत खरेदी केली. दरम्यान, हे एक राजकीय षड्यंत्र आहे. यातून वढेरा यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अननुभवी
44 वर्षीय वढेरा यांना प्रॉपर्टी व्यवसाय क्षेत्रात पूर्वीचा कसलाही अनुभव नाही. त्यांच्या जमीन खरेदी व्यवहारात महेश नागर नावाच्या व्यक्तीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.