आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन घोटाळा : प्रश्न विचारल्यावर भडकलेल्या रॉबर्ट वढेरांना भेटल्या सोनिया गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मीडियाच्या प्रतिनिधीवर भडकलेले सोनिया गांधींच्या जावयाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. सगळ्याच पक्षांकडून या प्रकरणावर निंदा करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणानंतर कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांच्या जावयाची राबर्ट वढेरांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या आहेत. दोघांमध्ये नेमकी कुठल्या विषयावर चर्चा झली याबद्दलची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.
दरम्यान काल घडलेल्या प्रकरणावर भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई आणि प्रियंका वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना ते फसवणूक करणारे असल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, आता त्यांना समजले पाहिजे की त्यांची सासू (सोनिया गांधी) सत्तेत नाही. त्यांना कोणत्याच प्रकारच्या सुरक्षेची गरज नाही. तर समाजालाच त्यांच्यापासून वाचण्याची गरज आहे. आजपर्यत असा कोणताच कायदा नाहीये जो असे सांगेल की, मीडिया त्यांना वाटेल ते प्रश्न विचारू शकेल. ते पुढे म्हणाले की, त्यांची एसपीजी सुरक्षादेखील काढून घेतली पाहिजे.

दुसरीकडे, कंट्रोलर एंड ऑडिटर जनरल (सीएजी) ने हरियाणामध्ये करण्यात आलेल्या त्यांच्या जमीन व्यवहारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीएजीच्या मते, तत्कालीन कॉँग्रेस सरकारने त्यांना कायदा तोडण्याची संधी दिली त्यामुळे वढेरांनी जवळपास 44 कोटी रुपयांचा अप्रत्याशित फायदा कमावला. याशिवाय, राज्य सरकारने वढेरांतर्फे डीएलएफ यूनिव्हर्सलला जमीन विकून कमावलेल्या फायद्याच्या वसूलीवर देखील लक्ष दिले नाही.
काल शनिवारी (1 नोव्हेंवर) कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा मीडियावर भडकले. होते. दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. न्यूज एजन्सी 'एएनआय'च्या वार्ताहराने जमीनीच्या व्यवहाराबाबत प्रश्न विचारल्यानंतर वढेरा भडकले. रागाच्या भरात त्यांनी प्रतिनिधीचा माइक बाजूला सारला. हे प्रकरण वाढत असल्याचे दिसताच घडलेल्या प्रकारावर वढेरा यांनी सांगितले की, मला माहित नव्हते की, प्रश्न विचारणारी व्यक्ती 'एएनआय'ची प्रतिनिधी आहे.

या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ पाहिला तर लक्षात येते की, जमीन व्यवहारावर प्रतिनिधीने प्रश्न विचारल्यानंतर वढेरा यांनी प्रतिनिधीला विचारले 'आर यू सीरियस'. यानंतर त्यांनी प्रतिनिधीच्या हातात असलेला माइक जोरात बाजूला सारला. उत्तर न देताच पुढे निघून गेले. विशेष म्हणजे घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी त्यांच्या सुरक्षारक्षाकांना व्हिडियो डिलीट करण्यासाठी सांगितले.
या सर्व प्रकरणावर भाजपने प्रतिक्रिया देत म्हटले, की नक्कीच या प्रकरणात कुठे तरी तथ्य आहे. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकर स्थापन झाल्यानंतर रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ यांच्यात झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा घटनेचा व्हिडियो...