आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robert Vadra The Income Tax Department Issued A Notice Boils

रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीला आयकर विभागाची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयकर विभागाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी कंपनीला नोटीस बजावली आहे. विभागाने कंपनीकडून २००५-०६ वर्षापासूनच्या सर्व जंगम-स्थावर व्यवहारांची माहिती मागवली आहे. कंपनीच्या मुख्याधिकार्‍याच्या नावाने २४ डिसेंबरला निघालेल्या या नोटिशीत २२ प्रश्न आहेत. उत्तर देण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, यावरून राजकारण सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव म्हणाले की, संशयास्पद व्यवहारांची माहिती मागवणे ही अधिकार्‍यांची जबाबदारी आहे. दुसरीकडे, सरकार यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. तथापि, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, नोटीस बजावणे हा एक नियमित प्रक्रियेचा भाग आहे. मीडिया वा इतरांनी अशा कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे करणे गैर आहे. वाड्रा यांनी कंपनी डीएलएफसोबत गुरगावमधील जमीन सौद्यांनंतर चर्चेत आली होती. कंपनीकडे मानेसर शहरात ३.५३ एकर आणि बिकानेरमध्ये ४७० एकर जमीन आहे.