आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्या मुस्लिम प्रकरणात भावनेला स्थान नाही : कोर्ट; पुढील सुनावणी १३ अाॅक्टाेबरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राेहिंग्या मुस्लिम प्रकरणात कायद्यानुसारच सुनावणी हाेईल. या प्रकरणात भावनेला काेणतेही स्थान दिले जाणार नाही, असे सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. केंद्र सरकार व याचिकाकर्त्यांनी राेहिंग्या मुस्लिमांच्या भावनात्मक मुद्द्यांसह या प्रकरणात हाेणाऱ्या वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडू नये, असेही न्यायालयाने सुचवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ अाॅक्टाेबरला हाेणार अाहे.

या प्रकरणाशी निगडित मानवीय मुद्द्यांवर सन्मानजनक सुनावणी अावश्यक अाहे. त्यामुळे सर्व पक्षांनी या प्रकरणाशी संबंधित अांतरराष्ट्रीय करार व इतर दस्तएेवज सादर करावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले अाहेत. केंद्र सरकारच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयात सांगण्यात अाले की, या प्रकरणात याचिकाकर्त्याचा उद्देश व न्यायिक समीक्षा या दाेन प्रमुख मुद्द्यांवर न्यायालयाने लक्ष केंद्रित करावे. दुसरीकडे अापला निर्णय अंतिम अाहे, असे केंद्र सरकार कसे काय म्हणू शकते? असे राेहिंग्या मुस्लिमांच्या वतीने  वरिष्ठ वकील फली एस.नरीमन यांनी सांगितले. सरकारने शरणार्थींप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे. त्यांना देशाबाहेर काढणे हे घटनेमधील अनुच्छेद १४ व २१च्या विरुद्ध अाहे. सरकारने २०११मध्ये इतर देशांतून अालेल्या शरणार्थींना दीर्घकाळाचा व्हिसा देण्यावर विचार करण्यात येत असल्याचे सांगितले हाेते. त्याचा सरकारला अाता कसा काय विसर पडला? असा प्रश्नही फली यांनी उपस्थित केला. त्यावर राेहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्याचा निर्णय परिस्थिती पाहून घेण्यात अाला असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...