आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनात CM यांचा विरोध, ‘आरक्षण विरोधी केजरीवाल\' चे नारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - आरएसएस या संघटनेने दलित विद्यार्थी रोहित वेमुलाचा आवाज दाबला. रोहित भारताच्‍या भवितव्‍यावर बोलत होता असे, म्‍हणत कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी संघावर टीका केली. जंतर-मंतरवर सुरू असलेल्‍या दलित विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनात सहभागी होऊन राहुल यांनी भाषण केले. तर अरविंद केजरीवाल व्‍यासपीठावर येताच विद्यार्थ्‍यांनी त्‍यांचा विरोध केला. केजरीवालांनी काय दिले उत्‍तर..
- केजरीवाल भाषण देण्‍यासाठी समोर आले तेव्‍हा युवकांमधून 'आरक्षण विरोधी केजरीवाल' आणि 'दलित विरोधी केजरीवाल' अशा घोषणा देण्‍यात आल्‍या.
- घोषणाबाजीला उत्‍तर देताना केजरीवाल म्‍हणाले,'मी कधी सांगितले मी आरक्षण विरोधी आहे.'
- 'मी आरक्षणाचा नेहमीच पुरस्‍कार केला आहे.'
- 'रोहितला समाज, सरकार आणि मंत्र्यांनी आत्‍महत्‍येसाठी परावृत्‍त केले होते.'
- ' त्‍या दोन मंत्र्यांची अजून चौकशीही केली नाही.'
- 'केजरीवाल म्‍हणाले, मी रोहितच्‍या परिवाराला आश्‍वासन देतो, त्‍याचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही.'
दिल्‍लीत निघाला मोर्चा..
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात न्‍याय मिळवण्‍यासाठी विद्यार्थी संघटना दिल्‍लीच्‍या जंतर-मंतरवर एकवटल्‍या. आंबेडकर भवनपासून जंतर-मंतरकडे विद्यार्थ्‍यांचा मोर्चा निघाला. भारिप बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चाचे नेतृत्‍व केले.
कॉंग्रेस, आपच्‍या संघटना आंदोलनात सहभागी...
-आंदोलनात सहभागी होणार असल्‍याचे अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितले.
- काँग्रेसची NSUI विद्यार्थी संघटना, आपची विद्यार्थी संघटना आंदोलनात सहभागी झाली.
- जेएनयूच्‍या विद्यार्थ्‍यांनीही मोठ्या संख्‍येने या मोर्चात सहभाग घेतला आहे.
काय म्‍हणाले प्रकाश आंबेडकर..
- प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चा संदर्भात माध्‍यमांशी संवाद साधला.
- सरकारने आपलाच विद्यार्थी संघ वाढवण्‍याचा प्रयत्‍न करून नये, असे ते म्‍हणाले.
- विद्यार्थ्‍यांना न्‍याय द्यावा, रोहित प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे.
- भगव्‍या संघटना सोडून मोर्चात सर्वच संघटना सहभागी झाल्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, केजरीवाल यांचे ट्विट व दिल्‍लीतील मोर्चाचे फोटो..
वाचा, रोहितने का केली आत्‍महत्‍या..