आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहित वेमुलाची अात्महत्या वैयक्तिक कारणाने, केंद्रीय समितीच्‍या अहवालातील निष्‍कर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहितने आत्महत्या नैराश्यातून केली होती - अहवाल - Divya Marathi
रोहितने आत्महत्या नैराश्यातून केली होती - अहवाल
नवी दिल्ली - हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी राेहित वेमुलाने वैयक्तिक कारणामुळे अात्महत्या केल्याचा निष्कर्ष केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या एक सदस्यीय चाैकशी समितीने काढला अाहे. तसेच ताे दलित समाजातील नसल्याचेही निवृत्त न्यायमूर्ती ए. के. रुपनवाल यांच्या समितीने सांगितले अाहे. राेहित काेणत्या कारणामुळे त्रस्त हाेता, याची माहिती त्याच्याकडेच असेल. लहानपणापासूनच ताे एकटा हाेता. जर त्याच्यावर विद्यापीठातून दबाव असता तर त्याने अात्महत्येपूर्वी चिठ्ठीत तसा उल्लेख केला असता,’ असे मतही अहवालात नमूद करण्यात अाले अाहे.

तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय व भाजपचे स्थानिक अामदार रामचंद्र राव यांनाही क्लीन चिट देण्यात अाली अाहे. या तिघांनीही अापापले कर्तव्य पार पाडले. राेहितवर कारवाई करण्यासाठी त्यांनी विद्यापीठावर काेणत्याही प्रकार दबाव अाणला नसल्याचे चाैकशीत स्पष्ट झाल्याचे अहवालात म्हटले अाहे.
 
प्रकरण काय : हैदराबाद विद्यापीठाने नाेव्हेंबर २०१५ मध्ये पाच विद्यार्थ्यांना होस्टेलमधून निलंबित केले हाेते. त्यापैकी एक असलेल्या राेहितने १७ जानेवारी २०१७ राेजी वसतिगृहातील एका खाेलीत अात्महत्या केली हाेती. विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळेच त्याने अात्महत्या केल्याचा अाराेप करण्यात अाला हाेता.
 
बातम्या आणखी आहेत...