आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rolls Royce Ghost Series II Launched At Rs 4.5 Crore

साडेचार कोटी रुपयांची कार, Rolls-Royce ने लॉन्च केली Ghost Series 2

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रीमियर लक्झरी कार मेकर कंपनी Rolls-Royce ने Ghost Series 2 ही कार आज (शुक्रवारी) भारतात लॉन्च केली. यापूर्वी लॉन्च केलेल्या मॉडेलच्या तुलने नव्या मॉडेलच्या इंटेरिअर आणि एक्सटेरिअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
कारच्या इंजिनामध्ये कोणत्याच प्रकारच बदल करण्यात आलेला नाही. नव्या कारमध्ये देण्यात आलेली रायडिंग आणि हॅडलिंगची सुविधा उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या Ghost नॉर्मल आणि एक्सटेंडेड व्हील बेस व्हर्जन भारतात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. द‍िल्‍लीत या कारची एक्‍स शोरूम किमत साधरण साडे चार कोटी रूपये आहे.

Ghost Series 2 मध्ये 6.75-litre V12 इंजिन बसवण्यात आले आहे. इंज‍िनची पॉवर 563bhp आणि 780Nm चे टॉर्क आहे. यामध्ये 8 स्पीड गिअर आहेत. टॉप स्पीड ताशी 250 किलोमीटर इतकी आहे. ही कार 4.9 सेकंदात 0 ते 100 चा वेग घेऊ शकते.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा, Ghost Series 2 कारची छायाचित्रे...