आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाचा आकडा पोहोचला 14000 कोटींवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 2013 मध्ये स्वित्झरलँडच्या स्विस बँकेत जमा असणा-या भारतीयांच्या काळ्या पैशाचा आकडा 2.03 बिलियन स्विस फ्रँक म्हणजेच भारतीय चलनात 14,000 कोटी रुपयांवर गेली आहे. स्वित्झरलँडच्या केंद्रिय बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये भारतीयांच्या 1.42 बिलियन स्विस फ्रैंक मध्ये 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.
स्विस बँकेने भारतीय अधिका-यांना ही माहिती दिली आहे. मात्र, ही रक्कम जुन्याच खात्यांमध्ये वाढली आहे, की नवीन खाती सुरू करण्यात आली आहेत, याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, ही रक्कम कोणाच्या नावावर असणा-या खात्यांमध्ये जमा आहे, हेही अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
देशातील काळ्या पैशाचा आकडा तीन वर्षांनंतरही समजेना
परदेशातील बँकांमध्ये देशातील कोणाचा किती काळा पैसा जमा आहे? त्याचे मालक कोण कोण आहेत? याची माहिती तीन वर्षांनंतरही मिळालेली नाही. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने 21 मार्च 2011 ला या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सुरुवात केली होती. यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीला 18 महिन्यांची डेडलाइन देण्यात आली होती. या काळात समितीला अहवाल सादर करायचा होता. 21 सप्टेंबर 2012 रोजीच ही डेडलाइन संपली आहे. मात्र, समितीचा अभ्यास अजून सुरुच आहे. अर्थ मंत्रालयाने माहिती अधिकाराच्या एका अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.