नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्ष १५० ते २०० कोटी रुपये खर्च करतील, असा अंदाज उद्योग मंडळ असोचेमने व्यक्त केला आहे. यातील बहुतांश पैसा राजकीय पक्ष खर्च करतील. त्यांच्या उमेदवारांचा वैयक्तिक खर्च कमी असेल.
नोव्हेंबर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी ३० ते ४० टक्के खर्च जास्त असेल, असे या संस्थेने म्हटले आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील जाहिरातींमुळे खर्च वाढला आहे. हा वाटा एकूण खर्चाच्या ६० टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत म्हणाले, उमेदवारांचा वैयक्तिक स्तरावर खर्च करण्याची मर्यादा ठरलेली आहे. राजकीय पक्षांसाठी अशी मर्यादा नाही. यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.