आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांत बंद होईल 2000 रुपयांची नोट, RSS चे एस.गुरुमूर्ती यांनी व्यक्त केले भाकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) आर्थिक विचारवंत एस. गुरुमूर्ती यांच्या मते, 2000 रुपयांची नवीन नोट पुढच्या पाच वर्षांत बंद होईल. नोटबंदीमुळे रकमेचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने ही नोट छापण्याचा निर्णय घेतला. परंतु, पुढील पाच वर्षांत ती बंद केली जाईल. भविष्यात 500 रुपयांची नोटच सर्वात मोठे चलन असेल.

दरम्यान, नोटबंदीमुळे बाजारात नोटांचा मोठा तुटवडा निर्माण होईल, हे आधीच ओळखून सरकारने 2000 रुपयांच्या नोटा छापल्या आणि त्या चलनात अाणल्या. भविष्यात देशात 500 रुपयांची नोट हीच सर्वात मोठी नोट असणार असल्याचेही गुरुमूर्ती यांनी सांगितले आहे.

गुरुमूर्ती म्हणाले, रघुराम राजन यांच्या निवृत्तीनंतर अवघ्या दोन महिन्यात घेतला निर्णय....
- गुरुमूर्ती यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या निवृत्तीनंतर दोन महिन्यात नोटबंदीचा निर्णय सरकारने घेतला.
- प्रचंड गोपनियतेत अल्प कालावधीत नोटबंदीचा सरकारने अचानक निर्णय जाहीर केला. त्यामुळे यात अचडणी राहाणे स्वाभाविक असल्याचे गुरुमूर्ती यांनी सांगितले.
- इतक्या अल्पावधीत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा छापणे शक्य नव्हते. त्यामुळे 2000 ची नोट चलनात आणणे सरकारला भाग पडले.
- गुरुमूर्ती यांनी नोटबंदीच्या निर्णयाला ‘वित्तीय पोखरण’ असे संबोधले आहे. पोखरण अणु चाचणीनंतर काय परिणाम होईल, याबाबत त्याकाळातही विचार करण्यात आला नव्हता.

# मनमोहन सिंह यांच्या वक्तव्यावर केला पलटवार
- गुरुमूर्ती यांनी सांगितले की, 'लोकांकडे जास्त पैसा आल्याने ते अनावश्यक खर्च करतात.'
- 'सिंहच्या 'मिस मॅनेजमेंट'च्या वक्तव्यावर गुरुमूर्ती यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मोदी सरकारने यूपीए सरकारच्या काम सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

# 20 टक्क्यांहून जास्त व्यवहार करणार्‍या बँकांची होईल चौकशी...
- काळाबाजार करणार्‍यांना नव्या नोटांचा पुरवठा करणार्‍यांवर सरकारची नजर आहे. बॅंकांच्या अधिकार्‍यांची चेन तोडण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत. सरासरी 20 टक्क्यांहून जास्त व्यवहारांचे बँक शाखांच्या रेकॉर्डची चौकशी होणार आहे.
- सूत्रांनी सांगितले की, सरकारने हाय-ट्रान्सझॅक्शन झालेल्या बॅंकांच्या शाखेची यादी तयार केली आहे. 60 टक्क्यांहून जास्त व्यवहार झालेल्या बॅंकांची आधी चौकशी होणार आहे.
- त्यानंतर 50 आणि 40 टक्क्यांपर्यंत व्यवहार झालेल्या बॅंकांची चौकशी होणार आहे. देशातील सर्व बॅंकांना फ्लाइंग स्क्वॉड स्थापन करण्‍याचे सरकारने निर्देश दिले आहे. त्याचप्रमाणे संशयित बॅंकांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा... कॅशलेस इंडियासाठी सरकारने आधी करायला हवीत ही 5 कामे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​
बातम्या आणखी आहेत...