आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत नवीन खासदारांच्या निवासावर २४ कोटी खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - १६ व्या लोकसभेतील नव्या खासदारांच्या निवास व्यवस्थेवर केंद्र सरकारने २४ कोटी रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी आरटीआयअंतर्गत विचारलेल्या माहितीत ही बाब समोर आली.
दिल्लीत खासदारांना सरकारी बंगला किंवा फ्लॅट वाटप होत नाही, तोपर्यंत त्यांना राज्यांतील भवन किंवा आयटीडीसीच्या हॉटेल्समध्ये राहावे लागते. याला ट्रांझिट अकोमोडेशन म्हटले जाते. याचा खर्च केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत कार्यरत संपदा संचालनालय करते. लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालयाच्या मंजुरीनंतर खर्च दिला जातो. निवासाचे वाटप झाल्यावर खासदारांना राहण्यास जाण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला जातो. एखादा खासदार जास्त दिवस थांबत असेल, तर त्यांचा अतिरिक्त खर्च मंजूर केला जाणार नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट केले जाते.
बातम्या आणखी आहेत...