आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rs 3600 Cr VVIP Chopper Deal With AgustaWestland Scrapped

ऑगस्टावेस्टलँडसोबतचा 3600 कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रकरण दडपले जाणार नाही आणि युपीए सरकारची प्रतिमा डागाळणार नाही याची दक्षता सर्वच पातळ्यां वर घेतली जात आहे. या मालिकेत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबतचा व्हीव्हीआयपींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे.
व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी या हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार होती. मात्र आज (बुधवार) संरक्षण मंत्रालयाने करार रद्द केला आहे. ऑगस्टावेस्टलँडकडून भारतीय हवाईदल व्हीव्हीआयपींसाठी 12 हेलिकॉप्टर खरेदी करणार होते. या करारासाठी दलालांना 300 कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने हा वादग्रस्त करार रद्द केला आहे.
दरम्यान, ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारप्रकरणी स्वित्झर्लंडच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी गाइडो राल्फ हॅश्क या मुख्य दलालास लाचखोरीच्या आरोपाखाली गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अटक केली होती.
3600 कोटी रुपयांचा ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करार पदरात पाडून घेण्यासाठी माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह काही भारतीय अधिकार्‍यांना लाच देण्यात आल्याचे आरोप झाल्यानंतर इटली आणि भारतीय तपास संस्था या व्यवहाराची चौकशी करत होत्या.