आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rss Analysis Of Delhi Election Says Campaign Against Kejriwal Big Blunder

RSS ला मान्य- केजरींवरील आरोपाने पराभव, BJP म्हणते- AAP चा विजय निश्चित होता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुखपत्र 'ऑर्गनायझर' च्या अग्रलेखात आम आदमी पार्टी (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजप नेत्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे दिल्लीतील जनतेत गैरसमज पसरला आणि हेच भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले, असल्याचे म्हटले आहे. या लेखानुसार, केजरीवालांवर झालेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे सत्तेत भागीदारी हवी असलेल्या जनतेला हा आपल्यावरचा हल्ला असल्याचे वाटले आणि त्यांनी 'आप'च्या बाजूने मतदान केले. या लेखात म्हटले आहे, की जनसंघापासून दिल्ली भाजपचा गड राहिला आहे. मात्र बदलत्या समाजासोबत ताळमेळ ठेवण्यात भाजपला अपयश आले. तर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा यांचे म्हणणे आहे, की टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या पराभवाची जी कारणे सांगितली जात आहे, त्यापेक्षा मला वाटते की जनतेने अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे निश्चित केले होते. जर भाजपने काही चुका टाळल्या असत्या तर आमच्या जागा वाढल्या असत्या, पण बहुमतापर्यंत जाणे तरीही अवघड होते.
मोफत पाणी आणि वीज सारख्या घोषणांनी विकासाच्या मुद्याला झटका
ऑर्गनायझरच्या लेखात म्हटले आहे, की 'आप'ने पाणी आणि वीज या दोन महत्त्वाच्या गोष्टी मोफत देण्याची घोषणा केली होती. यामुळे देशाच्या संभाव्य विकास अराखड्याला झटका बसू शकतो. केजरीवाल यांनी मोफत देण्याची जी घोषणा केली आहे, त्याचा इतरही विरोधक वापर करतील आणि हेच मॉडेल प्रचारात आणतील. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरून भाजपविरोधात वातावरण निर्मीती होऊ शकते. यातून केंद्रावर दबाव टाकून लोकानुनयाचे निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. असे झाले तर सरकारचा विकासाचा अजेंडा व्यापकपद्धतीने राबवणे अशक्य होऊन जाईल.
भाजप नेत्यांच्या दृष्टीने पराभवाची कारणे
मोफत वीज-पाणी आणि वाय-फायची घोषणा
दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या विजयाचे श्रेय हे त्यांच्या मोफत वीज-पाणी आणि वाय-फाय सारख्या घोषणांना दिले पाहिजे. या घोषणांना सर्वसामान्य जनता फसली. संपूर्ण दिल्लीत मोफत वाय-फाय ही घोषणा तरुणांना प्रभावीत करणारी ठरली. दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष प्रा. रजनी अब्बी यांचे म्हणणे आहे, की वीज-पाणी आणि मोफत वाय-फायसोबत महिला सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि शाळा-कॉलेज उघडण्याच्या घोषणा जनतेला महत्त्वाच्या वाटल्या.
भाजपचे प्रवक्ते आणि टिळक नगरचे उमेदवार राजीव बब्बर यांचे म्हणणे आहे, की आम्हाला निवडणूक अजेंडा प्रभावीपणे मांडता आला नाही.
काँग्रेस कमकूवत झाली
दिल्ली भाजपचे सचिव कृष्णलाल ढिलोर यांचे म्हणणे आहे, की या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्याचा सरळ फायदा आपला झाला. भाजपला 32.2 टक्के मते मिळाली. गेल्या विधानसभेच्या तुलनेत यात फक्त 1 टक्क्याने कमी झाली. तर, काँग्रेसला गेल्यावेळी 24.55 टक्के मते मिळाली होती, यंदा त्यांचा आकडा हा 9.7 वर थांबला. काँग्रेसची 14.85 टक्के मते ही आपकडे वळली. यंदा आपच्या मतांची टक्केवारी 54.2 टक्के राहीली तर गेल्या निवडणुकीत 29.49 टक्के मते त्यांना मिळाली होती. मतांच्या टक्केवारीत झालेली भरघोस वाढ आपला 67 जागा देऊन गेली.
नकारात्मक प्रचार
भाजपच्या पराभवात त्यांच्या नकारात्मक प्रचाराचा मोठा वाटा आहे. पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री आणि स्थानिक पदाधिकार्‍यांनी केजरीवाल यांना रोज पाच प्रश्न उपस्थित करण्याचा उलटा परिणाम झाला. तर, दुसरीकडे आपने दिल्ली डॉयलॉग सारखे कार्यक्रम केले. अनेक नेत्यांच्या वाचाळपणामुळे आपच्या उमेदवारांना सहानुभूती मिळाली आणि त्याचा फायदा झाला.
किरण बेदींना घेऊन येणे पडले महागात
निवडणुकीच्या ऐन तोंडावर किरण बेदी यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले, ही सर्वात मोठी चूक होती. पक्षाकडे या पदासाठी अनेक लायक उमेदवार असताना हायकमांडने घेतलेला हा निर्णय नेते आणि कार्यकर्त्यांना नापंसत ठरला. बेदी यांच्या ऐवजी डॉ. हर्षवर्धन यांना संधी दिली असती तर परिणाम वेगळे असते असे नेत्यांचे मत आहे.