आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिगडमधील धर्मांतरासाठी हिंदू संघटनेने केली निधीची मागणी, दारूल उलूम करणार विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीगड/आग्रा - आग्रा येथे काही मुस्लिम कुटुंबांचे बळजबरीने धर्मांतर केल्यानंतर सुरु झालेला वाद अजूनही शमलेला नाही. ख्रिसमसच्या दिवशी अलिगडमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम कुटुंबांचे धर्मपरिवर्तन करण्याची घोषणा करणारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (आरएसएस) संबंधीत धर्म जागरण समितीने बेकायदेशीर पद्धतीने निधी गोळा केल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे, इस्लामिक शिक्षणाशी संबंधीत दारुल उलूम देवबंदने सरकारने बेकायदेशीर धर्मांतरावर बंदी घालण्याची मागणी करतानाच धर्मांतरविरोधी पथक पुन्हा कार्यरत करण्याची घोषणा केली आहे. इस्लामच्या रक्षणासाठी जे-जे गरजेचे असेल ते सर्व संघटना करण्यास तयार असल्याचे देवबंने म्हटले आहे.
धर्मांतरविरोधी पथक करमार कार्यरत
दारुल उलूम देवबंदच्या धर्मांतरविरोधी पथकाला 'फितना-ए-इत्तिहाद' संबोधले जाते. या संघटनेशी संबंधीत अबुल कासिम नोमानी यांनी एका इंग्रजी दैनिकाला सांगितले, की संघटनेचे नेटवर्क संपूर्ण देशात आहे. त्याचा उपयोग इस्लामला वाचवण्यासाठी केला जाईल. यासोबतच, कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी देखील आमचे प्रयत्न असतील असे, त्यांनी स्पष्ट केले.
धर्मांतराचा 'भाव' ठरला
अलिगड येथे होऊ घातलेल्या धर्मांतर कार्यक्रमामध्ये कोणत्या धर्माला किती खर्च येईल याचे रेटकार्ड तयार केले गेले आहे. हिंदू संघटना धर्म जागरण मंचने वाटलेल्या पत्रकांमध्ये म्हटले आहे, की ख्रिश्चन धर्मांतरासाठी 2 लाख रुपये, तर मुस्लिमांसाठी 5 लाख रुपये खर्च येणार आहे. धर्म जागरण समितीच्या लेटर हेडवर छापलेले हे पत्रकर अलिगडमध्ये प्रत्येक घरात वाटण्यात आले आहे. यात धर्म जागरण समितीने मोठ्या प्रमाणात घर वापसी कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात म्हटले आहे, 'घर वापसीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. धर्मांतराचे काम हे फार मोठे आहे. यात तुम्ही योगदान द्या, जेणे करून सर्व व्यवस्था चांगली केली जाईल.'
मुस्लिम आणि ख्रिश्चनानां म्हटले समस्या
धर्म जागरण समितीनुसार ख्रिश्चन आणि मुस्लिम ही देशाची समस्या आहे. असे का, विचारल्यानंतर संघटनेचे काशीनाथ बंसल म्हणाले, 'ख्रिश्चन एक समस्या आहे. मुस्लिम एक समस्या आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला या समस्येवर काम करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो आणि त्याची गरज आहे.'

गोरखपूरचे भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी 25 डिसेंबर रोजी अलिगड येथे होणार्‍या धर्मांतर कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याची घोषणा केली आहे. अलिगडच्या माहेश्वरी कॉलेजमध्ये होणार्‍या या कार्यक्रमात 5000 ख्रिश्चन आणि 1000 मुस्लिमांचे धर्मांतर केले जाणार आहे. स्थानिक प्रशासनाने अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे म्हणत कार्यक्रमाला विरोध केला आहे. अलिगडचे पोलिस अधिकार्‍यांनी कार्यक्रम होऊ दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे.