आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Mohan Bhagwat And Asaduddin Owaisi Photo Share On Twitter By Digvijay Singh.

दिग्विजय सिंहांनी शेअर केला भागवत व ओवेसींचे छायाचित्र, एमआयएमची कडाडून टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. ते म्हणजे, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष असासुद्दीन ओवेसी यांचे एक छायाचित्र 'ट्विटर'वर शेअर केले आहे. दिग्विजय यांनी शेअर केलेल्या छायाचित्रात अर्धा चेहरा भागवत व अर्धा ओवेसींचा आहे.

हा तर मुसलमानांचा अपमान - ओवेसी
दिग्विजय सिंहांनी संघाच्या नेत्यासोबत मुस्लिम व्यक्तीचा फोटो शेअर करून देशातील मुसलमानांचा अपमान केल्याचे असासुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुलाच्या विवाहात बोलावून त्यांचे फोटो सोशल मीडियात पोस्ट करणारे दिग्विजय हे कोणत्या आधारावर मुसलमानांचा अवमान करत आहे, हेच समजत नसल्याचेही ओवेसींनी म्हटले आहे.

कॉंग्रेसच्या काळातच बिहारमधील भागलपूर, आसममध्ये हिसांचार झाला होता. बाबरी मशिदीत विध्वंस देखील कॉंग्रेसच्या कार्यकाळात झाला होता. इतकेच नव्हे तर डिसेंबर 1992 व जानेवारी 1993 मध्ये मुंबईत दंगल उसळली तेव्हा देखील कॉंग्रेसचेच सरकार होते. कॉंग्रेस देशातील मुसलमांना यापूर्वी देखील अपमानीत केले होते. एमआयएम ही एकमेव पक्ष भाजप व आरएसएसला देशात विरोध करत असल्याचे ओवेसींनी म्हटले आहे.

मित्राने हे छायाचित्र आपल्याला पाठवले आणि आपण ते शेअर केल्याचे दिग्विजय सिंह यांनी 'ट्विटर'द्वारे सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍स पाहा, दिग्विजय सिंह यांनी ट्‍विटरवर शेअर केलेला फोटो....