आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणाचा पुनर्विचार होण्याची गरज, सरसंघचालकांनी व्यक्त केले मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायजर' आणि 'पंचजन्य'ला दिललेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
गुजरातमधील पटेल समाजाने ओबीसी आरक्षणासाठी हिंसक आंदोलन सुरु केले आहे, त्या पार्श्वभूमीवर भागवतांनी व्यक्त केलेले मत महत्त्वाचे मानले जात आहे. आरक्षणाची खरी गरज कोणाला आहे आणि कोणाला नाही याचा विचार झाला पाहिजे, असे भागवत म्हणाले. एकाला लाभ देताना दुसऱ्याचे नुकसान होणार नाही याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी आरक्षणाचा फेरआढावा घ्यायला हवा. त्यासाठी एक अराजकीय समिती स्थापन करायला हवी असे भागवतांनी म्हटले आहे.
आरक्षणाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी अधिक होत आहे, हे थांबलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली. त्यासोबतच सामाजिक मागसलेपणावर आधारलेले आरक्षण ज्या पद्धतीने राबवले पाहिजे होते, त्याची तशी अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आताचे प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
पटेलांच्या आरक्षण मागणीमागे संघ असल्याचे बोलले जात होते, आता संघाच्या प्रमुखांनीच या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे सरकार आता या प्रश्नाकडे कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.