आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशभरातील हिंदूंवर अत्याचार वाढले, आरएसएसने खेळले हिंदू कार्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी एकीकडे अल्पसंख्यांकांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत तर, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांवर विजय मिळविण्यासाठी हिंदुंच्या एकजुटीची हाक देत आहे. संघ हा भाजपचा कणा असल्याचे बोलले जाते. मात्र, आता हा कणाच विरोधकांना (अल्पसंख्याक) पराभूत करण्यासाठी हिंदुनी एकत्र यावे असे सांगत आहे.
बंदद्वार झाली चर्चा
आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी बनारसच्या निवेदिता शिक्षा सदनमध्ये बंदद्वार चिंतन केले गेले. या बैठकीत उत्तरप्रदेशातील हिंदूंवर होणा-या अन्यायावर विशेष चर्चा झाली. आरएसएसचे काशी प्रांतचे नेते आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये या गुप्त बैठकीत लोकसभेची रणनीती ठरविली गेली. आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार आणि मधुभाई कुलकर्णी यांच्यासह 30 संघ प्रचारक बैठकीसाठी उपस्थित होते. संघाची पुढची बैठक रविवारी 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मुझफ्फरनगर दंगलीवर चर्चा
मोहन भागवत म्हणाले, उत्तरप्रदेशसह देशभरात हिंदुवर हल्ले वाढले आहेत. मुझफ्फरनगरचा उल्लेख करताना त्यांनी हे एक उदाहरण असल्याचे सांगितले. देशात हिंदूंवर हल्ले वाढले आहेत. आगामी निवडणुकीनंतर सत्तेवर येणा-या सरकारकडून, अशा कारवाया करणा-याविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन घेतले जाईल, ज्यामुळे भविष्यात अशा घटना घडणार नाही.