आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RSS म्हणाले GAY सेक्स काही गुन्हा नाही, हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समलैंगिकतेला गुन्ह्याच्या कॅटेगरीतून काढण्याचे उघड समर्थन केले आहे. समलैंगिकतेसारख्या मुद्द्यावर खरे तर संघाने चर्चा करण्यासारखे काही नाही. तो काही गुन्हा नाही, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले आहेत. संघात लवकरच महिलांच्या शाखा सुरु होतील आणि त्या पुरुषांसोबत शाखेत येतील असेही होसबळे म्हणाले.

वाद झाल्यानंतर स्पष्टीकरण
- गुरुवारी एका कार्यक्रमात रिलेशनशिपवर ते बोलत होते.
- त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे, 'अशी प्रकरणे मानसशास्त्रीय पद्धतीने सोडवली पाहिजे. समलैंगिक विवाहांवर बंदी घातली पाहिजे. समलैंगिकता गुन्हा नाही मात्र समाजासाठी ते नैतिक नाही.'

भारतात काय परिस्थिती
- भारत जगातील त्या 70 देशांपैकी एक आहे, जिथे समलैंगिकता गुन्हा आहे.
- भादंविच्या कलम 377 नुसार समलैंगिकता हा गुन्हा ठरतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षे शिक्षेची तरतूद आहे.
- दिल्ली हायकोर्टाने 2009 मध्ये कलम 377 रद्द केले होते.
- त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये 158 वर्षांपूर्वीचा हा कायदा कायम ठेवला होता.
- एलजीबीटी कम्युनिटीला दिलासा देत सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये आपल्या आदेशाचे पुनर्वालोकन करण्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन घटनापीठाकडे पाठवली.

आरएसएसच्या वक्तव्याचा अर्थ ?
- संघाचे सहकार्यवाह होसबळे यांच्या वक्तव्याने केंद्र सरकार कलम 377 रद्द करण्याच्या दिशेने पाऊले उचलण्याची शक्यता वाढली आहे.
- याआधी काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी खासगी विधेयक आणून समलैंगिकता गुन्हा ठरवू नये असे म्हटले होते.
- भाजप खासदारांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला होता.
- वास्तविक, . केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही अलीकडेच हा गुन्हा ठरवू नये असे म्हटले होते.
- जेटलींच्या आधी आरएसएसशी जवळचा संबंध असलेले आताचे भाजप महासचिव राम माधव यांनी समलैंगिकतेवर प्रत्येकाचे आपले मत असू शकते, मात्र आता जेव्हा हे कायदेशीर प्रकरण असल्यामुळे त्यावर सखोल विचार झाला पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये, संघाच्या शाखेत येणार महिला