आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Leader Ram Madhav News In Marathi On Jammu Kashmir

जम्मू-काश्मिर अब्दुल्ला कुटुंबीयांची पिढीजात संपत्ती नाही, कलम 370 वर संघाने खडसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मिर अब्दुल्ला कुटुंबीयांची पिढीजात मालमत्ता नाही, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी अब्दुल्ला कुटुंबीयांना खडसावले आहे. कलम 370 राहिल किंवा जम्मू आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काल ट्विटरवर केले होते.
यासंदर्भात बोलताना राम माधव म्हणाले, की जम्मू आणि काश्मिर भारताचा भाग राहणार नाही? हे राज्य ओमर यांची पिढीजात मालमत्ता आहे का? 370 असेल किंवा 370 नसेल, जम्मू आणि काश्मिर कायम भारताचा अविभाज्य भाग राहिल.
याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह टिवटिव करीत ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, की कलम 370 वर फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे नवीन पीएमओंनी सांगितले आहे. वॉव, फारच लवकर सुरवात झाली. मला माहित नाही असे कोण बोलत आहे. माझे शब्द गांभिर्याने घ्या. मी केलेली ट्विट सेव्ह करून ठेवा. एकतर कलम 370 राहिल किंवा जम्मू आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग राहणार नाही.
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, की जम्मू आणि काश्मिर या राज्याला उर्वरित भारताशी जोडणारा कलम 370 एक घटनात्मक दुवा आहे. यावर फेरविचार करण्याची चर्चा अत्यंत वाईट आणि बेजबाबदार आहे.