आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या पराभवाचे कारण शोधण्यासाठी संघाची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या लाजिरवाण्या पराभवामागची कारणे जाणून घेण्यासाठी गुरुवारी संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. संघाच्या केशवकुंज कार्यालयात त्यांनी सुरेश भय्याजी जोशी, सुरेश सोनी, दत्तात्रय होसबोळे आणि क्रिशन गोपाल यांच्याशी पराभवाची कारणमीमांसा केली.
संघाचा भाजपला पाठिंबा असताना अखेर पराभव का झाला, अशी विचारणा त्यांनी केली. ही नियमित मासिक बैठक असून त्यामध्ये संघाचे नेते देशातील विविध मुद्द्यांवर व संघाच्या कार्यक्रमांवर चर्चा करत असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. आपकडून सपाटून मार खाल्ल्यामुळे राज्य भाजपत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. लोकसभेतील विजयानंतर भाजपला अवघ्या नऊ महिन्यांत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.